नवी दिल्ली / मुंबई (दि. ६ मे):
७ मे रोजी भारतात देशव्यापी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित केली जाणार असून,
पहिल्यांदाच युद्धसदृश्य परिस्थितीची सरावात्मक तयारी देशभरात होत आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
यामुळे अमेरिका, युरोपसह आशियाई देशांचेही लक्ष भारताकडे वेधले गेले असून जागतिक स्तरावर सुरक्षा सतर्कता वाढली आहे.
गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार सर्व राज्यांना ही मॉक ड्रिल अनिवार्य केली असून, नागरिकांना हवाई हल्ला,
युद्धजन्य स्थिती आणि आपत्कालीन प्रतिसाद याची प्रत्यक्षात तयारी करून घेण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांच्या मुख्य सचिवांबरोबर उच्चस्तरीय बैठक सुरू आहे.
NDRF, SDRF आणि पोलिसांची तयारी; मुंबईत विशेष सत्र
या बैठकीला NDRF, SDRF, नागरी संरक्षण यंत्रणा तसेच विविध सुरक्षा यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
राज्यांमध्ये १० प्रमुख ठिकाणी सिव्हिल डिफेन्स पथकांकडून सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
समुद्रकिनारी चार ठिकाणी,
-
शहरी भागात सहा ठिकाणी
मॉक ड्रिल सादर केली जाणार आहे.
मुंबई जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात येणार असून,
तीन सत्रांमध्ये मॉक ड्रिल पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.
जागतिक यंत्रणांचे लक्ष भारताकडे
भारत-पाकिस्तान सीमेलगतचे तणावाचे वातावरण, सीमेवरील शस्त्रसंधी उल्लंघन आणि रशियाकडून भारताला मिळणारी
युद्धनौका या पार्श्वभूमीवर भारतातील ही मॉक ड्रिल फक्त राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्षवेधी ठरली आहे.
सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, हा सराव केवळ तयारीसाठी नसून भारताच्या जागतिक भौगोलिक रणनीतीचा एक भाग आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/nate-58-varshanantar-sivhil-defense-mock-drill/