‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची दशकपूर्ती; शहरात बाईक रॅली

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ'ची दशकपूर्ती; शहरात बाईक रॅली

अकोला, दि. २२ : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या ‘बेटी बचाओ,

बेटी पढाओया उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महिला व बालविकास

विभागातर्फे आयोजित मोटरसायकल फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी अजित कुंभार

Related News

यांनी हिरवी झेंडी दाखवून बाईक फेरीचा शुभारंभ केला. त्यात अनेक महिलाभगिनी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे,

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, बाल हक्क आयोगाचे सदस्य ॲड.संजय सेंगर,

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर व जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजश्री कौलखेडे आदी उपस्थित होते.

महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी सर्व क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले. हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

मुलगा- मुलगी असा भेदभाव न करता प्रत्येकाला समान हककांसह जगण्याची संधी मिळाली पाहिजे.

याच हेतूने ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ उपक्रमात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, असे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.

फेरीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून झाली. जिल्हाधिकारी कार्यालयापासून हिंदुहृदयसम्राट

बाळासाहेब ठाकरे उद्यान, शहर कोतवाली, माणेक चित्रगृह, संतोषी माता मंदिर,

पंचायत समिती मार्गे जिल्हा परिषद कार्यालय येथे समारोप करण्यात आला.

ऑटो युनियनचे सदस्यही मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
लिंगभेद चाचणी पध्दतीला प्रतिबंध, मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन,

त्यासाठी भरीव जनजागृती असा कार्यक्रम तालुका स्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी

व अभय केंद्रांचे संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे,

अशी माहिती महिला व बालकल्याण कार्यक्रम अधिकारी राजश्री कौलखेडे यांनी दिली.
शिक्षण विभागाद्वारे शैक्षणिक कार्यक्रम, महिला व बालविकास विभागामार्फत चाईल्ड

हेल्पलाईन 1098 व महिला सक्षमीकरण हेल्पलाईन क्रमांक 181 बाबत प्रचार,

शपथ व स्वाक्षरी अभियान, आरोग्य विभागाद्वारे शाळा व समाजात मासिक

पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, सॅनिटरी पॅड वितरण असे विविध उपक्रम जिल्ह्यात राबवले जात आहेत,

अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी यावेळी दिली.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/you-will-feel-pain-after-watching-incest-video-with-monalisa-during-kumbh-mela/

Related News