अकोलाच्या दोन कराटेपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
बारामती – राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अकोलाचा डंका
बारामती येथे येत्या २२ व २७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी अकोला जिल्ह्यातील दोन कराटेपटूंची निवड झाल्याची अभिमानास्पद माहिती समोर आली आहे.
अकोला शालेय विभागीय कराटे स्पर्धेत फ्लॉरेन्स नाशिककर (१८ वर्षे, ४८ कि.ग्रा.) हिने अप्रतिम कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर आपली जागा पक्की केली आहे. त्याचप्रमाणे शिवानी गोपाल पुंडकर (१४ वर्षे, ६८ कि.ग्रा.) हिनेही उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांकाचे मानस्थान मिळवत बारामती स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
Related News
दोन्ही प्रतिभावंत खेळाडूंना सुहासिनीताई धोत्रे (समाजकार्यकर्ता),सैय्यद जावेद अली (क्रीडा परिषद सदस्य), सिहान अरुण साखान (अध्यक्ष, महाराष्ट्र अॅमॅच्युअर कराटे असोसिएशन),
वासुदेव वाधा पाटील (महासचिव)यांच्या हस्ते अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.
या उल्लेखनीय यशाचे श्रेय डॉ. सेन्साई खुशबू चोपडे (कार्यसचिव, महाराष्ट्र अॅमॅच्युअर कराटे असोसिएशन) यांच्या प्रभावी प्रशिक्षणाला दिले जात आहे.दि.१९ नोव्हेंबर रोजी खेळाडूंचा सत्कार खा. अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी सिहान अरुण सारवान, वासुदेव वाधा पाटील व संदीप गावंडे यांनी दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अकोल्याच्या दोन कराटेपटूंनी राज्य पातळीवर दाखवलेलं हे यश जिल्ह्याच्या क्रीडाक्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलं आहे.
