अकोला : काल अकोला शहरातील हरिहर पेठ भागात झालेल्या दोन गटातील राडा नंतर या भागात तणावपूर्ण शांतता पसरली होती.
दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली होती, या दगडफेकीत काही नागरिक जखमी सुद्धा झाले आहेत..
पोलिसांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल असून या भागातील जनजीवन आता सुरळीत झालं आहे
मध्यरात्री पोलिसांनी दंगेखोरांना अटक करण्याची कारवाई सुरू केली होती
यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत सुमारे वीस ते पंचवीस जणांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केलं असून या भागात आता शांतता आहे…