ठाणे: धर्मवीर आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता वाढत होती. यशाच्या शिखरावर असताना त्यांना त्रास देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले.
इतकेच काय त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्याचे कारस्थान सुरु होते. दिघेंचे आयुष्य आश्रमात गेले. मात्र जेव्हा निधन झाले तेव्हा दिघे साहेबांची कुठे कुठे प्रॉप्रटीवर आहे, असा पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला होता. दिघे यांच्या प्रॉपर्टीवर उद्धव ठाकरेंचा डोळा होता, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, दिघेंचे जिल्हाध्यक्षपद काढले तर ठाणे जिल्ह्यात पक्षच उरणार नाही, असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा थांबले.
Related News
छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार
सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी होऊन दहा दिवसही
लोटले नसताना, आता परदेशींनीही पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतल...
Continue reading
शिवसेनेच्या नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत
आणि उबाठा गटाने टीका केली. याचा समाचार घेताना
आता मंत्री संजय शिरसाट हे दिसले आहेत.
संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर अनेक गंभीर आरोप केले....
Continue reading
अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार
ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील,
असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष...
Continue reading
ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत,
माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आणि
कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी
पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झे...
Continue reading
लंडनला तुमचे काय आहे, अमेरिकेत तुमचे काय आहे.
श्रीलंकेत तुमचे काय आहे. इतर कुठे कुठे काय काय आहे? आम्हाला सर्व माहीत आहे.
आम्ही सुद्धा 50 वर्षे 'मातोश्री'सोबत काढली आहे. आम्हाला ...
Continue reading
"थुंका ना मग. जनता तुमच्यावर थुंकली म्हणून तुम्ही लोकसभेला वाहून गेलात.
विधानसभेला पाप करुन निवडून आलात. रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना शिव्या घालतात.
तुमचा पक्ष मोठा नसून छोटा आहे. ...
Continue reading
गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरे यांचं…
काय डोंगर काय झाडी फेम माजी आमदार शहाजी बापू यांचं भाकीत काय?
आघाडीत बिघाडी झालीच आहे. आता थोड्याच दिवसात ते जाहीर करतील,
असा दावा करत...
Continue reading
Operation Tiger in Delhi : 'ऑपरेशन टायगर' ने महाराष्ट्रात पुन्हा राजकीय
भूकंपाची चाहुल लागली आहे.उद्धव सेनेला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
मंत्री उ...
Continue reading
Uddhav Thackeray : इकडे ठाकरेंच्या हस्ते ‘शिवबंधन’ पुस्तकाचं प्रकाशन, तिकडे शिवबंधन सोडून दहा जणांचा 'वर्षा'वर शिवसेना प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : शिवस...
Continue reading
कारंजा (रम)/ बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा ( रम) शेत शिवारातील शेतकरी
भास्कर बळिराम क-हे यांनी मागिल ३१ जुलै रोजी शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले
असल्याची ऑनलाइन तक्रा...
Continue reading
नागपूर विभागात जिल्हा प्रथम
गोंदिया : केंद्र व राज्य पुरस्कृत या दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली असून योजनेच्या
अंमलबजावणीत गोंदिया...
Continue reading
बदलापुरात दोन निरागस चिमुकल्यांवर एका नराधमानं अत्याचार केला.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरात बंदची
हाक देण्यात आली होती. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सर्व आं...
Continue reading
उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरेंचे नाव सुचवले म्हणून दिघेंना त्रास देण्यात आला, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. धर्मवीर आनंद दिघे यांनी मला आयुष्यात उभे केले. तुला समाजासाठी काम करायचेय हे दिघेंचे शब्द आजही कानात घुमतात. धर्मवीर सिनेमात यासंदर्भात राजन विचारे यांनी राजीनामा देऊ केल्याचा दाखवलेला प्रसंग काल्पनिक आहे.
प्रत्यक्षात त्यावेळी राजन विचारे राजीनामा देण्यास तयार नव्हते. जेव्हा दिघे साहेबांनी त्यांच्या भाषेत समजावले तेव्हा विचारे यांनी राजीनामा दिला. आता खरी वस्तुस्थिती सिनेमाच्या दुसऱ्या भागात समोर येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, रोज सकाळी भोंगा वाजतो. दुपारी दुसरा भोंगा वाजतो. तुम्ही २०१९ मध्ये जनतेशी बेईमानी केलीत. बाळासाहेबांचे विचार सोडून कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात.
देवेंद्र फडणवीसांनी ५० फोन केले पण तुम्ही एकही फोन उचलला नाही. उद्धव ठाकरेंचा कृतघ्नपणा यातून दिसून आला. राममंदीर उद्घाटनाला जाऊ शकला नाहीत, हे तुमचे दुर्दैव आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. महायुतीकडे नेशन फर्स्ट आहे तर महाविकास आघाडीकडे कट करप्शन कमिशन आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
मी फार प्रेमळ आहे. पण ठरवले तर करेक्ट कार्यक्रम करतो, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. मी कार्यकर्ता म्हणून प्रचाराला जातो, मुख्यमंत्री म्हणून नाही. मी जिथे जातो तिथे विरोधकांचा बाजार उठून जातो, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे.