तक्रार केल्यावर पोलिसांनी पीडितेलाच फटकारलं, व्हिडिओ व्हायरल
अलिगढ (उत्तर प्रदेश) – देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या
उत्साहात साजरी केली जात असताना, उत्तर प्रदेशमधील अलीगढ शहरात
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
झालेल्या शोभायात्रेदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
शोभायात्रेदरम्यान एका युवतीसोबत छेडछाड करण्यात आली.
विशेष म्हणजे, तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडितेला न्याय देण्याऐवजी पोलिसांनी तिलाच फटकारलं,
अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना सिव्हिल लाईन्स भागात घडली.
अंबेडकर जयंतीनिमित्त या भागात शोभायात्रा काढण्यात आली होती.
त्या वेळी काही तरुणांनी अश्लील वर्तन करत युवतीसोबत छेडछाड केली.
पीडित युवतीने सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर यांच्याकडे थेट तक्रार केली.
मात्र, तिला अपेक्षित न्याय मिळण्याऐवजी उलट इन्स्पेक्टरने तिलाच फटकारलं आणि तक्रार गांभीर्याने घेतली नाही.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून,
त्यामध्ये इन्स्पेक्टर पीडितेला ओरडताना स्पष्ट दिसत आहेत.
त्यामुळे अलीगढ पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून,
सोशल मीडियावर पीडितेला न्याय मिळावा आणि संबंधित
पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/economic-subatta-asal-tarcha-vitranshi-competition/