विशाल आग्रे | अकोट प्रतिनिधी
अकोट : आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत (NFSA) अंतर्भूत लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
अकोट तालुक्यातील सर्व परवानाधारक राशन दुकानदारांना जून,
जुलै आणि ऑगस्ट 2025 या तीन महिन्यांसाठी आगाऊ
अन्नधान्य वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शासकीय धान्य गोदाम, अकोट येथून मिळालेल्या माहितीनुसार,
जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार 7 मे 2025 रोजी
धान्य उचल संदर्भातील आदेश सर्व तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांना जारी करण्यात आले.
त्या अनुषंगाने अकोट तालुक्यातील दुकानदारांनी धान्य उचलण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या तारखा:
-
धान्य उचल : 31 मे 2025 पर्यंत
-
धान्य वितरण पूर्णता : 30 जून 2025 पर्यंत
-
दरमहा स्वतंत्र व्यवहार : प्रत्येक महिन्याचे वितरण स्वतंत्र व प्रामाणिक पद्धतीने करणे बंधनकारक
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, पूर,
निसर्ग आपत्ती आणि वितरणातील अडचणी टाळण्यासाठी धान्याचे आगाऊ
नियोजन करण्यात येत आहे. केंद्र शासनानेही यास मान्यता दिली असून,
राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय राबवला जात आहे.
अकोट तालुक्यातील लाभार्थ्यांनी आपल्या दुकानदारांकडून जून, जुलै
व ऑगस्ट 2025 महिन्यांचे धान्य नियोजित वेळेत उचलावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kirit-somayya-hatch-a-bhonga-harshvardhan-sapka/