अकोट : रोटरी क्लबच्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात ८०४ रुग्णांची तपासणी

रोटरी क्लब

अकोट येथील टाकपुरा येथील मारुती संस्थानच्या सभागृहात रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ अकोट यांच्या संयुक्त प्रयत्नाने भव्य प्रमाणावर मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्म्यांचे वितरण संपन्न झाले. नगर परिषद अकोटच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. नयना विशाल इंगोले, डॉक्टर विशाल इंगोले व नगरसेवक स्नेहल दाभेराव यांच्या उपस्थितीत ही सामाजिक उपक्रमाची सुरुवात झाली.

शिबिरामध्ये एकूण ८०४ रुग्णांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ५१२ गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील सर्व धर्म, वयोगटातील नागरिकांनी लाभ घेतला. शिवाय, तपासणीदरम्यान १५० रुग्णांना पुढील मोतीबिंदू तपासणीसाठी रोटरी आय हॉस्पिटलकडे पाठवले गेले. रोटरी आय हॉस्पिटलकडून डॉक्टर अनिल चेडे व ऑप्टोमेट्रीस्ट ज्ञानेश्वर इखार यांनी शिबिरात आपली सेवा दिली.

सदर शिबिराचे उद्घाटन रविवार, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत झाले. उद्घाटनकार्यक्रमात डॉक्टर विशाल इंगोले, प्रभाकर मानकर, नगराध्यक्षा सौ. मायाताई धुळे, उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी पवार व चंचल पितांबरवाले यांनी धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी किशोर जुनघरे, पोलीस निरीक्षक ग्रामीण तसेच नगरसेवक अमोल पालेकर, मंगेश लोणकर, रवी ठाकूर, बादल अहिर, निलेश नवघरे, इम्रान खान, मनोज चंदन, जितेश बरेठीया हे सन्माननीय नगरसेवक उपस्थित होते.

Related News

शिबिराच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लबच्या सचिव डॉक्टर नावेश मोहता, रवी मुंडगावकर, चंदू अग्रवाल, सुरेश व्यवहारे, राजकुमार गांधी, संतोष इस्थापे, शिरीष पोटे, दीपक कतोरे, उद्धव गणगणे, विजु सेदानी तसेच रणजीत खेडकर, सुशील लोणकर, विनोद रेळे, अनुप मुंडगावकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. तर दिनेश मेनसे, मुकेश कहार, प्रवीण यादव, श्याम धुराटे, पप्पू कैसर, करण सोळंके, भूषण लिल्हारे, प्रतीक लिल्हारे, विपुल शेले, यश बेलोकार, बाबूसिंग खन्नाडे, सुशील लोणकर, श्रीपाद धर्माधिकारी, संदीप लोणकर, विशाल चौधरी यासारख्या युवकांनी अथक परिश्रम घेतले.

सदर शिबिरामुळे अकोट परिसरातील नागरिकांना मोफत नेत्र तपासणी आणि चष्म्यांचा लाभ मिळाला असून, नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले. रोटरी क्लब व ट्रस्टच्या या उपक्रमाने डोळ्यांच्या आरोग्याकडे लोकांचे लक्ष वेधले असून भविष्यात अशा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/5-reasons-why-sanju-samson-got-a-deal-in-playing-11-and-bharatla-will-get-the-benefit-of-victory-t20-world-cup-2026/

Related News