अकोट : अकोट ते अकोला या महत्त्वाच्या मार्गावर रेल्वे पूल ते पैलवान बाबा मंदिर दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे साईड शोल्डर न भरल्यामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. परिणामी नागरिकांच्या जिवितास गंभीर धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे लक्षात न आल्याने दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात किंवा वाहन वळवावे लागते, त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढतो. पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांची खोली अंदाजणे कठीण होत असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित विभागाकडून या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अनेकदा तक्रारी करूनही दुरुस्तीचे कोणतेही ठोस काम हाती घेतले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. याउलट काही सुज्ञ नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत जेसीबीच्या साहाय्याने खड्डे खोदून आपल्या कॉलनीकडे जाण्यासाठी तात्पुरता रस्ता तयार केल्याचे दिसून येते. मात्र अशा अनियोजित कामांमुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Related News
अकोट तालुक्यातील मौजे चंडिकापूर येथे पंधरावा वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या नाली व पेव्हर ब्लॉकच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ...
Continue reading
कल्याण, दि. 17 मार्च 2026 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या क्लस्टर योजनेविरोधात आज ...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील सौदळा–वारखेड शेतशिवार परिसरात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घालत एका रात्रीत सहा जनावरांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे...
Continue reading
अकोट तालुक्यातील आंबोडा गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अकोट ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेत...
Continue reading
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात अनेक दिवसांपासून विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांकडे महसूल विभागाने डोळेझाक केल्याचे चित्र समोर आल...
Continue reading
भंडारा जिल्ह्यातील Pawni शहरात एक धक्कादायक आणि तितकाच विचार करायला लावणारा प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षेच्या भीतीने अवघ्या 12 वर्षांच्या विद्यार्थ्याने स्वतःच्याच अपहरणाचा ब...
Continue reading
लाखपुरी (ता. मुर्तिजापूर), दि. ४ : निसर्गाच्या भरवशावर जगणाऱ्या साध्या शेतकरी कुटुंबातील एका तरुणाने जिद्द, चिकाटी आणि नियोजनाच्या बळावर बँकिंग क्षेत्रात मोठे यश संपादन करत गावाचे ...
Continue reading
अकोट नगरपालिकेत दोन महिने आधी भारतीय जनता पक्ष आणि एमआयएम यांच्यात झालेल्या स्थानिक युतीने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवल...
Continue reading
अकोट तालुक्यातील भंडाराज (ता. अंजनगाव सुर्जी) येथे होली क्रॉस दवाखान्याजवळील छोट्या पुलाजवळील धोकादायक वळणावर बुधवारी मोठा अपघात झाला. मारुती सुझुकी...
Continue reading
नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे साईड शोल्डर भरून खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे मतही पुढे येत आहे. आता या गंभीर समस्येची संबंधित विभाग कितपत दखल घेतो, याकडे अकोटकरांचे लक्ष लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/russia-social-media-ban-shock-2026-100m-users-affected-whatsapp-telegram-blockchain-shocking-decision/