अकोल्यात १९५ धोकादायक घरमालकांना बजावली नोटीस.

पावसाळ्याच्या

पावसाळ्याच्या दिवसात जोरदार पाऊस आल्यानंतर

जीर्ण झालेल्या इमारती जमीनदोस्त होत असतात.

त्यात जीवित हानी होण्याची शक्यता जास्त असते.

Related News

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मनपाच्या नगररचना विभागाच्यावतीने

जीर्ण झालेल्या घरमालकांना नोटीस बजावून अशी जीर्ण घरे

कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी स्वतः सुरक्षितपणे पाडून घ्यावीत

आणि नवीन बांधकाम करावे, असे नोटीस द्वारे सुचित केले जाते.

मात्र या नोटीस कडे घर मालक किंवा भाडेकरू दुर्लक्ष करतात

आणि अनुचित घटना घडल्यानंतर दोष मनपाला दिला जातो.

असे होऊ नये म्हणून मनपा नगररचना विभागाने मान्सूनपूर्व जीर्ण घर मालकांना

नोटीस दिल्या होत्या. आता प्रत्याक्षात पावसाळा आणि दम दार पाऊस पडतो आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा मनपा प्रशासनाने शहरातील चारही झोन क्षेत्रातील

सुमारे १९५ धोकादायक घरमालकांना नोटीस बजावली आहे.

अकोला महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच धोकादायक घरांचा सर्वे करून

घर मालकाना घरे पाडून नव्याने बांधण्यात यावी,

या संबंधीचे नोटीस देण्याचे काम करते.

मात्र, दरवर्षी धोकादायक घरांचा मुद्दा ऐरनिवर असतो.

महापालिका क्षेत्रात एकूण १९५ धोकादायक इमारती व घरे असून,

यातील बहुतांश इमारती जुने शहर परिसरात आहेत.

धोकादायक घरांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिका वारंवार घरमालकांना कळवते.

शहरात झोननिहाय जीर्ण इमारतींची संख्या एकूण १९५ जीर्ण इमारती आहेत.

यामध्ये पूर्व विभागातील ६८, पश्चिम विभागातील ८०, उत्तर विभागातील ४५

आणि दक्षिण विभागातील २ समावेश आहे.

अंतर्गत नगररचना जीर्ण इमारतींचा महानगरपालिका विभागाने

काही धोकादायक इमारतींचे आयुष्य संपले असल्याबाबत

नोटिसा बजावल्या आहेत.

नगररचना विभागाने काही इमारतींना मुदत संपण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत

शहरातील चारही झोनमध्ये पावसाळ्यापूर्वी जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण,

नगररचना विभागाने एका कनिष्ठ अभियंत्यााने केले आहे.

शहरातील सर्व जीर्ण इमारतीच्या मालकाच्या मालमत्तेचे कागदपत्रे मागितली जातात.

अधिक जीर्ण इमारतींसंबंधी तज्ञांचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल नंतर

जीर्ण इमारत मालकांना नोटीस जारी केली जाते.

Read also: https://ajinkyabharat.com/water-supply-in-akola-city-decreased-in-one-day/

Related News