आनंद बुद्ध विहार, मोरझाडी येथे बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींची प्रतिष्ठा
मोरझाडी (ता. बाळापूर, जि. अकोला): दि. २८ ऑक्टोबर २०२५, मंगळवार रोजी आनंद बुद्ध विहार, मोरझाडी येथे श्रद्धा, आनंद आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरणारा ऐतिहासिक सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या मंगल सोहळ्यात भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींची प्रतिष्ठापना मोठ्या धार्मिक उत्साहात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व बौद्ध उपासक व उपासिकांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून पंचांग प्रनाम अर्पण केला. यानंतर धम्मगुरु पुज्य भंते बोधानंदजी (थेरो) यांच्या मंगल उपस्थितीत धम्मवंदना पार पडली. त्यांनी आपल्या प्रेरणादायी धम्मदेशनेतून समाजात करुणा, मैत्री आणि समता यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी आयुष्यमान श्री. सदानंद केशव पाटील (रोजगार सेवक, मोरझाडी) यांनी या मूर्तींचे दान करून आपल्या धम्मनिष्ठेचा आणि सामाजिक बांधिलकीचा उच्च आदर्श प्रस्थापित केला. त्यांच्या या अनमोल योगदानाबद्दल उपस्थित मंडळींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली.
Related News
पतीच्या निधनानंतर दोन महिन्यांनी Aruna Irani यांचा भावूक व्हिडीओ; म्हणाल्या, ‘शेवटच्या श्वासापर्यंत अशीच साथ द्या!’
Aruna Irani Emotional Video : ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईराणी या...
Continue reading
राहुल गांधी यांनी गर्भवती महिला पत्रकाराला धक्का दिला? भाजपचा गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?
SIR विरोधातील आंदोलनादरम्यान महिला पत्रकारासोबत गैरवर्तन झाल्याचा भाजपचा दावा; ऋचा पारा...
Continue reading
ध्रुव राठीची 58 कोटींची संपत्ती? कमाईचे 5 मोठे स्रोत जाणून घ्या!
Dhruv Rathee Net Worth: प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असतो. राजकारण, ...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “सरकार मोठी चूक करतंय, आम्हाला हेच हवंय!”
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गां...
Continue reading
Green Teaफक्त पिण्यासाठी नाही; त्वचेच्या ग्लोसाठीही ठरू शकते उपयोगी, जाणून घ्या वापरण्याच्या ५ सोप्या पद्धतीGreen Tea हा आरोग्यासाठी फायदेशीर पेय म्हणून ओळखला जातो....
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्व...
Continue reading
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
Flydubai विमान हल्ला प्रकरणी इराणचा खळबळजनक दावा; ट्रम्प-नेतान्याहूंच्या वक्तव्यांमुळे वाढला संभ्रम
Flydubai Flight Attack: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या Flydubai विमानातील धक्कादाय...
Continue reading
सिंधुदुर्गात 900 कोटींच्या जमीन व्यवहाराचा आरोप; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, मंत्र्यांच्या भूमिकेवरही सवाल
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमीन व्यवहारावरून महाराष्ट्राच्या रा...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचा भाजपवर खोचक टोला
पश्चिम बंगाल निवडणुका आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या पद्मभूषण मागणीवर राऊतांचा उप...
Continue reading
सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता; केंद्र सरकारकडून आयात शुल्कात मोठी कपात
कच्च्या सोयाबीन आणि पामतेलावरील शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्के; कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल...
Continue reading
कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांनी मिळून “जयभीम” आणि “नमो बुद्धाय” या घोषणांनी संपूर्ण परिसर बुद्धमय केला. उपस्थितांनी बुद्ध व बाबासाहेबांच्या शिकवणींचे अनुकरण करून समाजात समता, बंधुता आणि शांततेचा संदेश पसरवण्याचा संकल्प व्यक्त केला.
मोरझाडीतील हा सोहळा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्याचा उत्सव ठरला असून, स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत बुद्ध विहार परिसर उजळवून टाकला.
नमो बुद्धाय, जयभीम!
read also : https://ajinkyabharat.com/us-india-trade-deal-to-be-finalized-soon-trumps-3-pushy-legislation/