अकोला, प्रतिनिधी |
अकोला ते दर्यापूर या मार्गावर दररोज खासगी वाहने प्रवासी वाहतूक करत असून,
या प्रवासामध्ये सुरक्षेचा गंभीर अभाव दिसून येतोय. प्रवाशांसह जड पोत्यांचे लोडिंग,
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
झिजलेले टायर्स, खराब ब्रेक सिस्टिम आणि बंद न होणारे दरवाजे अशा धोकादायक स्थितीत ही वाहने रस्त्यावर धावत आहेत.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वाहनांमध्ये ५० ते ६० किलो वजनाची पोती प्रवाशांसोबत भरली जातात.
काही वाहनांच्या टायरची अवस्था इतकी खराब आहे की, ते कधीही फुटून मोठा अपघात घडवू शकतात.
याशिवाय काही वाहनांचे ब्रेक व्यवस्थित काम करत नाहीत, आणि दरवाजे नीट लागत नाहीत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
प्रवाशांनी आरोप केला आहे की, हे खासगी वाहनचालक स्थानिक पोलीस आणि काही अधिकाऱ्यांना मासिक हप्ता देतात,
त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. नियमांचे सर्रास उल्लंघन करूनही ही वाहने निर्भयपणे प्रवासी वाहतूक करत आहेत.
या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, “या वाहनांनी अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची?
RTO या अपघातांसाठी जबाबदार असेल का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अकोला ते दर्यापूर मार्गावरील खासगी वाहतुकीकडे प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन
विभागाने (RTO) गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/industry/