अकोला |
14 एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त
सार्वजनिक भीम जयंती समितीतर्फे शहरात सायंकाळी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
या रॅलीची सुरुवात अग्रेसन चौकातून झाली. रॅलीत बाबासाहेबांच्या
जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे चित्ररथ आणि देखावे हे विशेष आकर्षण ठरले.
या रॅलीत भंते, बौद्ध धम्म गुरु, समितीचे अध्यक्ष दिवाकर गवई, उपाध्यक्ष संजय डोंगरे,
तसेच अनेक समाजबांधव आणि बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीचा मार्ग अकोट स्टँड चौक, माणिक टॉकीज, कोतवाली चौक,
गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, बसस्थानक चौक असा होता
आणि अखेरीस अशोक वाटिकेत रॅलीचा समारोप झाला.
चित्ररथांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा, डॉ. पंजाबराव देशमुख,
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याशी असलेले प्रसंग रेखाटण्यात आले होते.
या देखाव्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
अकोला शहरातील विविध भागांमधून आलेले अनुयायी अशोक वाटिकेत एकत्र झाल्याने
“निळा भीमसागर” उसळल्याचे दृश्य पाहायला मिळाले. रॅली दरम्यान “जय भीम”
च्या घोषणा, अनुशासनबद्धतेने मिरवणूक आणि सामाजिक सलोखा यांचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidya-congress-aani-underground-worker/