अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती.
Related News
तणावमुक्त जीवनासाठी झोपेचे महत्त्व; अपुरी झोप ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत तणाव (stress) हा प्रत्येकाच्...
Continue reading
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर Amruta Fadnavis यांचा गंभीर गौप्यस्फोट; कॉर्पोरेटमधील अनुभवांबाबत व्यक्त केल्या भावना
नाशिकमध्ये सुरू असलेल्या कथित कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावरून र...
Continue reading
‘Bigg Boss Marathi 6’ मध्ये मोठा ट्विस्ट! मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरेची धमाकेदार एंट्री
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो
Continue reading
१६ वर्षांनंतर न्यायाचा विजय: विपुल अमृतलाल शाह यांचा धनादेश अनादर प्रकरणात मोठा विजय
बॉलिवूडमधील नामांकित निर्माता-दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह
Continue reading
आनंदाची बातमी! एलपीजीवरील अवलंबित्व कमी होणार? सरकारचा Ethanol कडे मोठा कल
भारतातील ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणारी एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या...
Continue reading
पीडित मुलीच्या तक्रारीवरून रामदास पेठ पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी रामदास पेठ पोलीस ठाण्याने विशेष पथक गठीत केले.
सदर पथकाने सततच्या प्रयत्नांनंतर आरोपीचा माग काढत त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
“पीडित मुलीच्या तक्रारीनंतर तत्काळ गुन्हा दाखल करून आम्ही आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार केलं होतं.
आज आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.”
— मनोज बहुरे, पोलीस निरीक्षक, रामदास पेठ पोलीस स्टेशन, अकोला