हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता
राज्यातील प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. हरियाणामध्ये
सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य
Related News
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
शास्ती पुर्ण माफ करण्याचा प्रस्ताव पाठवा
बार्शीटाकळी तहसील कार्यालयात संत सेवालाल महाराज बंजारा/लभाण तांडा समृद्धी योजनेच्या समित्यांची बैठक
जस्तगावातील शेतकऱ्यांचा तेल्हारा तहसीलवर मोर्चा;
मूर्तिजापूर : ग्रामीण भागातील वीजबिल निम्मे करण्याची मागणी
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
लढत होणार आहे. दरम्यान, हरियाणामध्ये आकारास येत असलेल्या
दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षांच्या आघाडीमुळे अनेक
समिकरणं बदलण्याची शक्यता आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी
दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी आणि चंद्रशेखर आझाद यांच्या
आझाद समाज पार्टी यांच्यातील आघाडीची औपचारिक घोषणा झाली आहे.
हरियाणा विधानसभेतील एकूण ९० जागांपैकी ७० जागांवर जननायक जनता पार्टी
निवडणूक लढेल. तर २० जागांवर आझाद समाज पार्टी निवडणूक लढवणार आहे.
या आघाडीच्या घोषणेनंतर चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले की, या आघाडीची घोषणा
आज करण्यात आली आहे. मात्र त्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती.
हरियाणा पुढे गेला पाहिजे, ही आमच्या मनातील इच्छा आहे. भीम आर्मी आणि
आझाद समाज पक्ष येथे बऱ्याच काळापासून कार्यरत आहे. तर जेजेपीचे सर्व नेते
आणि भावी मुख्यमंत्रीही आपल्यासोबत आहेत. आजपासूनच कंबर कसून निवडणुकीच्या
तयारीला लागा, असं आवाहन मी माझ्या कार्यकर्त्यांना करतो, असेही चंद्रशेखर आझाद यावेळी म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/mamata-banerjees-polygraph-test-bjps-hue-and-cry/