इस्रायल–हमास युद्धविरामानंतर सुरू झालेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान इस्रायलच्या सैन्याला रफाह भागात जमिनीखाली तब्बल 7 किलोमीटर लांब आणि 25 मीटर खोल असलेलं विशाल भुयार सापडलं आहे. हे भुयार साधं बोगद्यासारखं नसून त्यामध्ये 80 हून अधिक खोल्या, शौचालये, वैद्यकीय सुविधा, ऑपरेशन रूम, शस्त्रसाठ्यासाठी गुप्त जागा अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेलं संपूर्ण लघु शहर वसवण्यात आल्याचं इस्रायली सैन्यानं सांगितलं आहे.
इस्रायल आर्मीने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सांगितलं की हे भुयार गाझाच्या त्या भागात आढळलं आहे, जिथे यापूर्वी शरणार्थी कॅम्प, मुलांच्या शाळा आणि हॉस्पिटल होते. या विशाल भूमिगत रचनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सैन्यानुसार ही रचना अत्यंत मजबूत काँक्रीटची असून आतमध्ये वायुवीजन व्यवस्था, इलेक्ट्रिकल वायरिंग, जनरेटरद्वारे वीजपुरवठा, दोन मजली खोल्या, शस्त्रसाठा, दारुगोळा अशा सुविधा उपलब्ध आहेत.
इस्रायलनं सर्वात मोठा दावा केला आहे की या भुयारामध्ये हमासकडून 2014 च्या युद्धात मृत्यू झालेल्या इस्रायली लेफ्टनंट हदार गोल्डिन यांचा मृतदेह लपवून ठेवण्यात आला होता. गोल्डिन यांच्या मृतदेहाचा मुद्दा अनेक वर्षांपासून इस्रायल–हमास चर्चेचा केंद्रबिंदू होता. युद्धविरामानंतर झालेल्या नव्या करारानुसार हमासनं गोल्डिन यांचे अवशेष इस्रायलला परत दिल्याची माहिती सैन्यानं दिली.
Related News
‘Madhuri’ हत्तीणीची अखेर घरवापसी! उपचारानंतर कोल्हापुरात परतताच अनंत अंबानी ‘X’वर ट्रेंड; नेटकऱ्यांनी मानले आभार
कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याची आणि भावनिक नातं असलेली हत्तीण ‘
Continue reading
Bigg Boss 20: घरात पहिल्याच आठवड्यात मोठा राडा; कनिका मान-यंग डीएसएपासून माही विज-आम्रपाली दुबेपर्यंत जोरदार भांडणं
Bigg Boss 20: ‘Bigg Boss 20’च...
Continue reading
क्राकाटाऊ ज्वालामुखीजवळ गेलेली स्पीडबोट बेपत्ता; 5 पत्रकारांसह 8 जणांचा शोध सुरू
इंडोनेशियातील सक्रिय अनाक क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या
Continue reading
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; 2029 लोकसभा निवडणुकीसाठी 40 मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
शिवसेना ठाकरे गटाने आगामी 202...
Continue reading
तुमच्या आधार कार्डवर दुसऱ्याने सिमकार्ड घेतलंय का? घरबसल्या तपासा; अनोळखी नंबर आढळल्यास करा ही कारवाई
आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक ना...
Continue reading
सात दिवस, सात फळं! सफरचंदापासून किवीपर्यंत; आठवड्याभरात कोणत्या दिवशी कोणतं फळ खावं?
Healthy Tips : सध्याची धावपळीची जीवनशैली, अनियमित आहार आणि व...
Continue reading
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
शेतात गाडले 5 लाख रुपये, जागाच विसरला; वर्षभरानंतर सापडले पण वाळवीने केलं सगळं उद्ध्वस्तराजस्थानमधील बालोतरातून एक धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्या...
Continue reading
मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद! 7 ते 9 ऑगस्ट 'वनरंग 2026'मध्ये 4 जमाती, 12 राज्यांचा सहभाग
वनरंग 2026 : महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीतील नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण से...
Continue reading
ॲनालॉग पनीर म्हणजे काय? महाराष्ट्रात तुकाराम मुंढेंनी का घातली बंदी? 7 सोप्या मार्गांनी ओळखा अस्सल की बनावट पनीर
मुंबई : महाराष्ट्र सरकारने ॲनालॉग पनी...
Continue reading
देशासाठी गोल्ड जिंकणारा मराठी खेळाडू राज ठाकरेंच्या दारात 2 तास ताटकळला; नाशिकमधील घटनेने क्रीडाविश्वात संताप
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
Continue reading
रमेश म्हात्रेंना जामीन; मात्र हायकोर्टाच्या कठोर अटींमुळे महाराष्ट्राबाहेर राहावे लागणार
रमेश म्हात्रे प्रकरण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्...
Continue reading
IDF नुसार, हे भुयार केवळ आश्रयस्थान नसून हमासच्या लष्करी कारवायांसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत प्रगत सुविधांनी तयार केलेले नेटवर्क आहे. आतमध्ये वैद्यकीय खोली, संप्रेषणासाठी स्वतंत्र विभाग, शस्त्रे लपवण्यासाठी गुप्त कप्पे आणि दहशतवादी हालचालींसाठी सुरक्षित मार्गिका तयार करण्यात आल्या होत्या.
गाझा पट्टीतील संघर्षामुळे हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला असून अनेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत. युद्धविरामानंतर इस्रायलचं सर्च ऑपरेशन सुरू असून या भुयाराचा शोध लागणे म्हणजे गाझातील भूमिगत प्रणाली किती मोठी आणि गुंतागुंतीची आहे याचा मोठा पुरावा असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.
इस्रायलनं आगामी काळात या भुयाराचं संपूर्ण जाळं नष्ट करण्याची आणि गाझातील इतर भूमिगत रचना शोधण्याची कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/10-best-places-for-cheapest-alcohol-in-india-best-places-to-get-cheapest-alcohol-in-india/