रस्त्याच्या मागणीसाठी “प्रहार” आक्रमक!

अकोल्यातील डाबकी रोड भागातील महत्वाचा असलेल्या

कॅनॉल रस्त्याचे सुमारे पंचवीस ते तीस वर्षापासून

रस्त्याचे कामे प्रलंबित आहे.

Related News

या रस्त्या करिता आमदार बच्चू कडू हे

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना

त्यांनी सदर रस्त्याच्या कामाकरीता

निधी उपलब्ध करून दिला होता.

मात्र या रस्त्यावर केवळ खडीकरण करण्यात आले

रस्त्याच्या दोन्हीही बाजूला नदीचे बांधकाम करण्यात येत आहे.

मात्र हे काम अतिशय मंद गतीने सुरू असून

काही भागात हेतुपुरस्सर नालीचे बांधकाम थांबवण्यात आले आहे.

जर मोठ्या प्रमाणात पाऊस जर झाला

तर नागरिकांच्या घरामध्ये तसेच रस्त्यावर पाणी साचत आहे.

त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

सदर प्रकरणात प्रशासनाने लक्ष न दिल्यास

महानगरपालिकेच्या परिसरात नालीचे घाण पाणी

व चिखल टाकून महानगरपालिकेच्या परिसरातच

आंदोलन करण्यात येईल,

असा इशारा प्रहार संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/nationalist-congress-party-sharadchandra-pawar-pakshachaya-ladhyala-yash/

Related News