वाशिम जिल्हा: वाशिम पोलीस विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई करत एका आरोपीला देशी बनावट पिस्टलसह ताब्यात घेतले आहे. वाशिम जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या सततच्या प्रयत्नांमुळे शहरातील गुंडप्रवृत्तीचे प्रकरणे कमी करण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत. विशेषतः अशा इसमांवर लक्ष ठेवले जाते, जे प्रसारमाध्यमांत फोटो-व्हिडीओ शेअर करून भितीचे वातावरण निर्माण करतात.
दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनिय माहिती मिळाली की, पंचशिल नगर परिसरात एका व्यक्तीकडे देशी बनावट पिस्टल आहे. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ एक तातडीची टिम तयार करण्यात आली. पंचशिल नगर परिसरात शोधाशोध करताना, महादेव मंदिराजवळ आरोपी उभा असल्याचे निदर्शनास आले.
पोलीस ताब्यात येताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती केली. आरोपीच्या जवळून एक स्टीलची देशी बनावट पिस्टल, ज्यावर दोन्ही बाजूंना ब्राऊन रंगाचे फायबर ग्रीप आणि पिवळे रंगाचे स्टार कोरलेले होते, तसेच मॅगझिनमध्ये दोन जिवंत राउंड आढळले.
Related News
मुंबई लोकलमध्ये महिलेवर बेल्टने हल्ला; आरोपीचा धक्कादायक दावा, पोलिस तपासात समोर आलं वेगळंच सत्य
Mumbai Local Shocker Video : मुंबईच्या लोकल ट्रेनमधील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मी...
Continue reading
Kalyan Dombivli News : भिवंडी दुर्घटनेपासून डोंबिवलीतील घरफोड्यांपर्यंत; कल्याण-नवी मुंबईत एकाच दिवशी अनेक गंभीर घडामोडी
ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई परिसरा...
Continue reading
पुणे : पुण्यात महाविद्यालयीन 21 वर्षीय तरुणीवर सलग एक वर्ष कथित लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक. वाघोली पोलिसांचा तपास सुरू.
राज्यातील शैक्षणिक नगरी म्हणून ओळखल्या ...
Continue reading
Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा तणाव, मुंबईत 15 दिवसांसाठी जमावबंदी; पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण
मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंद...
Continue reading
विद्यार्थ्यांच्या ‘संसद मार्च’दरम्यान तणाव; जंतरमंतर परिसरात गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक
CJP च्या संसद मार्चदरम्यान गोंधळ : संसदेच्या पावसाळी अधिवेशना...
Continue reading
CJP च्या ‘संसद मार्च’मुळे दिल्ली हाय अलर्टवर; 5,000 हून अधिक सुरक्षा जवान तैनात, प्रतिबंधात्मक आदेश लागू
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने ...
Continue reading
मोठी दुर्घटना! भरधाव पॅसेंजर ट्रेनची शाळेच्या व्हॅनला जोरदार धडक; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात गुरुवारी सकाळी अत्यंत दुर्दै...
Continue reading
Coastal Road Accident : मुंबईच्या कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात; कारला आग, शेकडो वाहने अडकली, मोठी खळबळ
मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या कोस्टल रोडवर बुधवारी दुपारी भीषण अपघात घडल्य...
Continue reading
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या माकडाने मागील दहा दिवसांपासून धुमाकूळ घातला असून आतापर्यंत तीन जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. सुरुवातीला लीलाबाई रेखाते यांच्यावर हल्ला...
Continue reading
5 धक्कादायक खुलासे! पेरोलवर बाहेर आलेल्या आरोपीने लुटीनंतर तुरुंगात लपण्याचा प्रयत्न केला, नागपूर पोलिसांनी केला पर्दाफाश
नागपूरमध्ये मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर आलेल्या सरा...
Continue reading
मुंबईतील साकीनाका मॅनहोल दुर्घटनेनंतर आयुक्त अश्विनी भिडे यांनी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले होते. मात्र ७ दिवस उलटूनही कंत्राटदाराने नोटिशीला उत्तर न दिल्याने का...
Continue reading
उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये दागिन्यांच्या दुकानात सीलबंद पाण्याच्या बाटलीत ॲसिड असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. पाणी समजून द्रव पिल्यानंतर तरुणीची प्रकृती गंभीर झाली असून मेर...
Continue reading
आरोपीने स्वतःचे नाव पवन चिंतामण जोरेवार, वय २२ वर्ष, रा. पंचशिल नगर, वाशिम असे सांगितले. पोलीसांनी त्याला वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असून, त्याने हे शस्त्र कधी, कोणाकडून आणि कशासाठी आणले याबाबत तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नवदीप अगरवाल, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि योगेश धोत्रे आणि त्यांच्या टीमच्या अथक परिश्रमांमुळे शक्य झाली.
वाशिम पोलीस विभाग सततच्या धडक मोहिमांद्वारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करत असून, शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी कटिबद्ध आहे. अशी कारवाई पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या वचनबद्धतेचा नमुना आहे.
read also : https://ajinkyabharat.com/balapur-talukyat-rohicha-haidos-aloshi-kaloshi-shivrat-3-acre-wheat-peak-demolished/