आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी असते.
तेच भक्तीमय वातावरण आणि तोच उत्साह दरवर्षी
आकोल्यातील जुन्या शहरातील विठ्ठल मंदिरात अनुभवायला मिळतो.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
अकोट नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांसाठी दिलासादायक अभय योजना;
जुन्या शहरातील हे विठ्ठल मंदिर ३२० वर्षे जुने असून
1933 पासून येथे विविध उत्सवांसह अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.
जुन्या शहरात समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले काळा मारोती मंदिर,
शहरातील आराध्यदैवत राजराजेश्वर मंदिर
तसेच तीनशे वर्षांहून अधिक जुने प्राचीन विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे.
या मंदिराची स्थापना दिवंगत पोपटलाल अग्रवाल
यांच्या पूर्वजांनी केल्याचे सांगितले जाते.
1933 पासून येथे अखंड हरिनाम सप्ताह व विविध उत्सव सुरू झाले.
तात्यासाहेब देशपांडे हे या हरिनाम सप्ताहाचे प्रणेते होते.
त्या दरम्यान येथील वृद्ध भारतीय महिला शारदा मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
आषाढी एकादशीनंतरच्या चार महिन्यात म्हणजेच चातुर्मासात
मंदिरात नामसंकीर्तन केले जात असे.
हे शहरातील सर्वात मोठे आणि एकमेव विठ्ठल मंदिर असल्याने
आषाढीच्या वेळी या मंदिरात मोठी गर्दी असायची.
मंदिरातील उत्सवादरम्यान शहरासह देशभरातील कीर्तनकारांनी
येथे उपस्थिती नोंदवली आहे. याशिवाय मंदिरात प्रवचन,
हरिपाठ, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
Read also: https://ajinkyabharat.com/karnataka-governments-new-law-to-provide-job-reservation-to-local-youth/