गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार गट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर
काही नेत्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्यासह महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.
त्यानंतर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या मस्साजोग येथे जाऊन
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांचे सांत्वन केले. मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग दौऱ्यावर आहेत.
यावेळी त्यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांशी देखील संवाद साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार
आरोपी कृष्णा आंधाळेला लवकर अटक करण्यात यावी, यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ येत्या 25 तारखेला उपोषण करणार आहेत.
तर हा विषय खूप संवेदनशील असल्याचे म्हणत मस्साजोग गावातूनच मनोज जरांगे पाटील यांनी थेट
बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना फोन केला.
बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना फोन करून मनोज जरांगे पाटील यांनी काही मागण्या केल्यात.
मस्साजोगचे ग्रामस्थ येत्या 25 तारखेला उपोषण करणार असून यासंदर्भात निवेदन असलं नसलं तरी त्यांना
सहकार्य करण्याची विनंती मनोज जरांगेंनी केली. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी करत या प्रकरणातील
आरोपींची सीडीआर काढा आणि कृष्णा आंधळेला अटक करा, असे म्हटले.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/she-did-not-come-from-bund-dhasana-rautancha-indicator-tola-mhanale-tayancha-burkha/