मलेशियामध्ये एका अत्यंत अनोख्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका 73 वर्षीय भिक्षूला तब्बल 2.28 कोटी रुपयांची लॉटरी लागली असून, या घटनेनंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ही बातमी जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे.
चान चाई सियांग असे या भिक्षूचे नाव असून, ते एका आश्रमात साधे जीवन जगतात. पूर्वी एका कंपनीत काम केल्यानंतर वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी संन्यास स्वीकारला होता. तेव्हापासून ते भिक्षुजीवनात राहून दानातून मिळणाऱ्या अल्प रकमेत आपले जीवन व्यतीत करतात.
प्राप्त माहितीनुसार, त्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या छोट्या बचतीमुळे ते बँकेच्या लकी ड्रॉमध्ये सहभागी झाले होते. याच लकी ड्रॉमधून त्यांना 2.28 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले.बँकेकडून ही माहिती देण्यासाठी फोन करण्यात आला असता, चान यांनी सुरुवातीला हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचा संशय घेतला. त्यांनी बँकेचा फोन तीन वेळा कट केला. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी स्वतः आश्रमात जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेट देत लॉटरी जिंकल्याची पुष्टी केली.
Related News
बॉसचा अपमान ठरला टर्निंग पॉइंट! नोकरी सोडून उभारलं ३७.८ कोटींचं रेस्टॉरंट साम्राज्यमोठ्या पगाराची नोकरी, आलिशान जीवनशैली आणि प्रतिष्ठित कंपनीमध्ये वर...
Continue reading
डोंबिवली येथील शार्दुल विचारे याने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे घेण्यात आलेल्या CA इंटरमीडिएट 2026 परीक्षेत देशभरा...
Continue reading
शिर्डी : खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांनी शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या विषयांवर स्पष्ट ...
Continue reading
अकोला शहरातील खदान परिसरातील ख्रिश्चन कॉलनी येथे असलेल्या सानिया उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी (25 जून) सकाळी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस ...
Continue reading
रोबोटिक्स क्षेत्रात चमकली ऋतूपर्णा : प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून NEET परीक्षेला सामोरे जातात. अनेक विद्यार्थ्यांना यश मिळतं, तर काहींच्या वाट...
Continue reading
बीड जिल्ह्यातील गाजत असलेल्या विलास घुले हत्या प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचे पुत्र सौरभ ...
Continue reading
सत्य शंकर यांच्या यशाची प्रेरक कहाणी : व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मोठे भांडवल किंवा उच्च शिक्षणच आवश्यक असते असे नाही. योग्य वेळी योग्य संधी ओळखून त्यावर मेहनतीने काम केले, तर साम...
Continue reading
जग थक्क करणारी कहाणी: हॅकर आणि साक्षीदाराची 25 वर्षांची अनोखी मैत्री, मृत्यूपूर्वी दिली कोट्यवधींची भेट
आश्चर्यकारक सत्य! हॅकर आणि साक्षीदाराची अनोखी मैत...
Continue reading
आईच्या निधनानंतरही 23 वर्षीय सोहन मांजरेकरने CA Final 2026 मध्ये AIR 3 मिळवत देशात कमावलं मोठं नाव
Dombivli News : आयुष्यातील कठीण प्रसंग माणसाल...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
‘मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी’मध्ये प्रतीक्षा लोणकरचा छोट्या भूमिकेत मोठा प्रभाव!
‘मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी’ ही वेब सीरिज सध्या प्रेक्षक...
Continue reading
ही माहिती समजताच चान यांनी कोणताही आनंद किंवा आर्थिक मोह न दाखवता अत्यंत शांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी हे यश कोणताही चमत्कार नसून पूर्वजन्मातील कर्मांचे फळ असल्याचे सांगितले.
दरम्यान, मिळालेली संपूर्ण रक्कम स्वतःकडे न ठेवता ती समाजसेवेसाठी वापरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यामध्ये आजारी भिक्षूंच्या उपचारासाठी मोठा हिस्सा, तसेच आश्रमातील सुविधा सुधारण्यासाठी आणि सामाजिक-धार्मिक कार्यांसाठी निधी खर्च करण्यात येणार आहे.
त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक माध्यमांवर ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेकांनी “खरे साधेपणाचे उदाहरण” असे म्हणत त्यांच्या विचारांचे स्वागत केले आहे.ही घटना केवळ नशिबाची नाही, तर साधेपणा, त्याग आणि मानवी मूल्यांची प्रेरणादायी कहाणी म्हणून समोर येत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/shocking-39-second-venezuela-double-devastating-earthquake-10000-dead/