जिल्हाधिकाऱ्यांनी केले गुणवंत विद्यार्थ्यांना पर्यावरण पोषक झाडांचे वितरण
कुंभार समाजाचा अभिनव उपक्रम
देशाच्या जडण घडणीत युवा विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असुन शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध
असुन जिद्द व चिकाटी च्या भरवश्यावर कुठलेही ध्येय सहजपणे गाठता येते.असे प्रतिपादन आकोला स्थीत महाराष्ट्र
कुंभार समाज विकास परिषद व्दारा आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव तसेच विविध क्षेत्रात कर्तव्यशिल बांधवांच्या सत्कार समारंभात केले आहे.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थीत विद्यार्थांना ‘एक झाड एक विद्यार्थी याप्रमाणे गुणवंत
Related News
विद्यार्थ्यांना पर्यावरण पोषक रोपांचे वितरण केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण साविकर हे होते तर
प्रमुख आतिथी म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार, युवा उद्योजक किशोर कापडे, प्रदिप जी लोलूरे (उपविभागीय अभियंता मेहकर )
यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते संत गोरोबा काका कुंभार यांच्या मुर्तिचे पुजन करण्यात आले असुन तद्नंतर जिल्हाधिकारी
यांचे हभप सुभाषजी कोल्हे यांचे वतिने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सोबतच ईतर मान्यवरांचाही समाजाच्या वतिने शाल व
पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला तदनंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला यामध्ये सन २०२३ ते २०२४
या वर्षातील इयत्ता १०वी१२ चे विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांना प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन
गौरव करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने समाज बाधवांनी उपस्थिती दर्शवीली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव राम
मेहरे यांनी केले होते तर सुत्र संचालन रामदास गाडेकर व आभार प्रा.दिलिप अप्तुरकार यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री सुनिल साविकर,योगेश इंगळे,तुळशिदास तळोकार, विजय मेहरे, भाष्कर गद्रे,
पत्रकार राजेश साविकर,प्रकाश चांदुरकर समवेत ईत्यादी कंभार समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/santosh-deshmukh-murdered-in-beedhchya-massage-parlor/

