सियाने 12 दिवसांपूर्वी केलेल्या 5 कथित कृतींनी उलगडला कट ?
पुण्यातील उद्योजक केतन अगरवाल यांच्या मृत्यू प्रकरणातील तपासात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. पोलिसांच्या तपासानुसार, केतन यांच्या मृत्यूपूर्वी अवघ्या 12 दिवस आधी घडलेली बाली प्री-वेडिंग ट्रिप रद्द होण्याची घटना आता या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानली जात आहे. तपास यंत्रणांचा दावा आहे की, केतन यांची होणारी पत्नी सिया गोयल हिने त्यांचा पासपोर्ट मुद्दाम नष्ट केल्यामुळे ही परदेशवारी रद्द झाली होती. या घटनेमागे केवळ योगायोग नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
प्री-वेडिंग शूटसाठी जाणार होते बालीला

Related News
फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाल्यानंतर 6 जून रोजी केतन अगरवाल, सिया गोयल आणि त्यांचे दोन सहकारी प्री-वेडिंग फोटोशूटसाठी इंडोनेशियातील बाली येथे जाणार होते. सर्व तयारी पूर्ण झाली होती. विमानाची तिकिटे, हॉटेल बुकिंग आणि संपूर्ण नियोजन करण्यात आले होते.
मात्र मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर केतन यांचा पासपोर्ट गायब असल्याचे लक्षात आले. इतर तिघांकडे त्यांचे पासपोर्ट सुरक्षित होते, मात्र केतन यांच्याकडेच पासपोर्ट नव्हता. त्यामुळे त्यांना प्रवास रद्द करून परतावे लागले.
गाडीत फक्त चारच जण
)
केतन यांचे वडील विशाल अगरवाल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घरातून निघाल्यानंतर गाडीत फक्त चारच जण होते. सर्वांनी आपापले पासपोर्ट, परदेशी चलन, क्रेडिट कार्ड आणि आवश्यक कागदपत्रे एका पाऊचमध्ये ठेवली होती.मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर सर्वांकडे पासपोर्ट होते, मात्र केतन यांचा पासपोर्ट गायब होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच या घटनेबाबत कुटुंबीयांना संशय होता.
पोलिसांचा दावा : पासपोर्ट फाडून वॉशरुममध्ये टाकला

पोलिसांच्या तपासानुसार, पुढील चौकशीत सिया गोयल हिने केतन यांचा पासपोर्ट घेतला, तो फाडून टाकला आणि विमानतळाकडे जाताना नाश्त्यासाठी थांबलेल्या एका हॉटेलच्या वॉशरुममध्ये टाकून दिला. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या घटनेमुळे केतन यांची बाली ट्रिप रद्द झाली.या आरोपांची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून, अंतिम सत्य न्यायालयीन निर्णयानंतरच स्पष्ट होईल.
प्रेमसंबंधांमुळे निर्माण झाला होता वाद?
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. कुटुंबाच्या इच्छेनुसार सिया आणि केतन यांचा विवाह ठरला होता. मात्र हे लग्न सियाला मान्य नसल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपासात असा आरोप करण्यात आला आहे की, या प्रेमसंबंधांमुळे केतन अडथळा ठरत असल्याचे मानून त्याला कायमचे दूर करण्यासाठी कथित कट रचण्यात आला. या दाव्यांची सत्यता न्यायालयीन सुनावणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
लोहगड दुर्घटना की पूर्वनियोजित कट?
तपासकर्त्यांच्या मते, बाली ट्रिप रद्द होण्यापासून ते लोहगड किल्ल्यावर घडलेल्या घटनेपर्यंतच्या सर्व घटनांची साखळी एकमेकांशी जोडलेली असू शकते. त्यामुळे पासपोर्ट हरवण्याची घटना या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानली जात आहे.
पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल डेटा आणि संबंधित व्यक्तींचे जबाब तपासले जात असून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.
