अकोला : कार्यकर्ता यांना हा समर्पित व जनतेच्या सेवेसाठी मंत्रीपदाचा आपण वापर करून समाजातील पीडित वंचितांना
न्याय देण्याचा काम करून पक्ष विस्तारासोबत समाजातील अठरापगड जाती आणि बारा बलूनदारांचा विकास
करून ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वप्नपूर्ती करण्यासाठी कटीबद्ध असे अभिवचन राज्याचे कामगार मंत्री नामदार एडवोकेट
Related News
आकाश भाऊसाहेब फुंडकर यांनी दिले.
हॉटेल शुभकर्ता स्थानिक बस स्टॅन्ड मागे येथे भाजपा तर्फे नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी
भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मागटे, पाटील हे होते. मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर,
खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल,
नगर अध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल तेजराव थोरात अर्चना मसने वैशाली निकम चंदाताई शर्मा,
माधव मानकर, भाजपा कोषाध्यक्ष वसंत बाछुका कृष्णा शर्मा,
एडवोकेट देवाशिष काकड, राधिका तिवारी,,
रमेश अल्लकरी,सजयगोटफोडे, आधी विराजमान होते.
पक्षाने दिलेली जबाबदारी तसेच स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर तसेच माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे यांनी दाखवलेला मार्ग
आपण जीवनामध्ये अंगीकार करून सामाजिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असून विदर्भ आणि मराठवाड्यातील
सोबत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व पक्षाने दिलेली जबाबदारी ही महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या विकासासाठी
आपण कटिबद्ध राहू आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व पक्ष संघटनेने आपल्या लहान कार्यकर्त्यावर मोठी जबाबदारी दिली आहे
ही जबाबदारी जनतेच्या विकासास कामासाठी वापर करू अशीही यावेळी नामदार आकाश फुंडकर म्हणाले.
यावेळी अकोला विमानतळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, एमआयडीसी या विषयावर नामदार आकाश फुंडकर लक्ष देऊन
अकोला जिल्ह्याला न्याय देतील असा विश्वास खासदार अनु पधोत्रे यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी खासदार व माजी कृषीमंत्री लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या अनेक
आठवणींना उजाळा देऊन युवा नेतृत्व गेल्या दहा वर्षांमध्ये जनतेचा मन जिंकून आकाश कुंडकर यांनी एक वेगळी प्रतिमा निर्माण केली
त्याचा लाभ पक्ष विस्तारासाठी पश्चिम विदर्भात होईल असा विश्वास व्यक्त करून जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यात ही यशस्वी ठरतील
आणि अकोला ही भाऊसाहेब फुंडकर यांची कर्मभूमी होती त्याच धर्तीवर एका मिनिटांमध्ये सत्काराला होकार देऊन एडवोकेट आकाश
कुंडकर यांनी अकोले करांचा मन जिंकलं अशा शब्दात आमदार सावरकर यांनी त्यांच्या गौरव केला.
यावेळी आमदार प्रकाश भारसाकले, यांनी आकाश कुंडकर यांना शुभेच्छा देऊन त्यांनी पालकमंत्री पद घेऊन
अकोल्याच्या विकासाला चालना द्यावी असे अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी 127 कामगार संघटना विविध सामाजिक संघटना च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सतत साडेतीन तास चाललेला हा कार्यक्रम
हा सगळ्यांना मन जिंकून घेतला सगळ्यांचं स्वागत स्वीकार करून जेष्ठांचा सन्मान नामदार फुंडकर यांनी देऊन सर्व कार्यकर्त्यांची मन जिंकून घेतली.
यावेळी मातृशक्ती युवाशक्ती समाजातील सर्व घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते कामगार संघटना
विविध क्षेत्रातील मान्यवर विधी ट पत्रकार संघटना तसेच वेगवेगळ्या वृत्तपत्र विक्रेता संघ सह वेगवेगळ्या
संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आलं. यावेळी भक्ती आणि शक्ती संत तुकाराम महाराज आणि शिवाजी
महाराज यांची संयुक्त प्रतिमा नामदार पुंडकर यांना भेट देण्यात आली तसेच शिर्डी वरून गुलाबाचा हार नेत्यांचे स्वागत
करण्यात आला तसेच परंपरागत ढोल ताशांनी आतिषबाजीने जय भवानी जय शिवाजी
भारत माता की जय वंदे मातरम या जय घोषाने परिसर दुमदुमले.
कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी तर प्रास्ताविक किशोर पाटील तर आभार प्रदर्शन एडवोकेट देवाशिष
काकड यांनी केले. ग्रामीण आणि शहरी भागातील मोठ्या संख्येने
पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/jingle-bells-jingle-bells-jingle-all-the-way-christian-bandhwani-