अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसीएच) उपचारासाठी आलेल्या एका आदिवासी महिलेने आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालय परिसरात फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
घटनेची दखल घेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर शुक्रवारी आमदार साजिद खान पठाण यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालय प्रशासनासोबत बैठक घेऊन संबंधित घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली.
प्राथमिक चौकशीत काही कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा झाल्याचे समोर आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांनी दोन कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
Related News
7 तास उन्हात ताटकळत उभे शेतकरी! सावरा येथे युरिया खतासाठी भीषण रांगा, बळीराजाचा संताप अनावर
अकोल्यातील हृदयद्रावक घटना; GNM विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, फी वाढीमागील 5 गंभीर प्रश्न
“अकोला रुग्णालयातील संतापजनक घटना: पतीला वाचवण्यासाठी पत्नीची हृदयद्रावक धडपड” धक्कादायक 5 वास्तव!
गीता नगरमधील ओपन स्पेसला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
केळी बागा जमीनदोस्त! मान्सूनपूर्व वादळी पावसाने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
अकोल्यात आयजीपीं महेश पाटीलची धडाकेबाज एंट्री ; गुन्हेगारी नियंत्रणासाठी 10 महत्त्वपूर्ण निर्देश !
-
By
Vivek Raut
आगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ! १३ दिवस उलटले तरी ट्रॅक्टरचा शोध नाही, शेतकरी संतप्त
अकोला Water Crisis: ६०० मिमी जलवाहिनी दुर्घटनाग्रस्त, २ दिवस पाणीपुरवठा खंडित; हजारो नागरिकांना मोठा फटका
फक्त 500 रुपयांसाठी 10 लाखांचे नुकसान; 18 एकर शेती पेटवणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
-
By
Vivek Raut
45°C उष्णतेचा कहर! अकोल्यातील केळी बागा पिवळ्या; हजारो शेतकऱ्यांवर भीषण संकट
-
By
Vivek Raut
आमदार साजिद खान पठाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रुग्णसेवेत कोणतीही हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. चौकशीदरम्यान आणखी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाल्यास त्यांच्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात येईल. रुग्णांना वेळेत आणि सन्मानपूर्वक सेवा मिळणे ही रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या घटनेनंतर रुग्णालयातील सुविधा, स्ट्रेचर व व्हीलचेअर उपलब्धता तसेच रुग्ण मार्गदर्शन व्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.