अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द ते करी या मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असल्याने नागरिक, वाहनधारक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कंत्राटदाराकडून कामाला अपेक्षित वेग दिला जात नसल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
रस्त्यावर अनेक ठिकाणी मुरूम व गिट्टी टाकून ठेवण्यात आली असून त्यावरून वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे किरकोळ तसेच गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून काही जणांना कायमचे अपंगत्व आल्याचीही माहिती नागरिकांनी दिली.
सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना याच मार्गाने शेतात ये-जा करावी लागते. मात्र, रस्त्यावरील खडी-मुरूमामुळे ट्रॅक्टरसह इतर वाहने अडकत आहेत. तसेच गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या पशुपालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून काही जनावरांच्या पायांना गिट्टी लागून जखमा झाल्या आहेत.
Related News
SBIचा मोठा निर्णय! 12 हजार कर्मचाऱ्यांची होणार भरती; 250 नव्या शाखाही उभारणार
पाकिस्तानला मोठा झटका? बेल्जियमने भारताला दिले महत्त्वाचे आश्वासन!
मुंबईत दहीहंडीला गालबोट! दुपारी 12 वाजेपर्यंत 22 गोविंदा जखमी
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा
Vidyanand Bapat Dance Video : दहीहंडीत DJच्या तालावर ‘बापट’ थिरकले; पुणेकरांची भन्नाट कल्पकता चर्चेत!
Prime Minister Modi झाले विद्यार्थी! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांकडून घेतला वक्तृत्वाचा सल्ला
Manoj Jarange Patil उपोषणावर, सरकारचा मोठा निर्णय! 62 महसूल मंडळांत कुणबी नोंदींचा शोध
Vinod Tawde चा मोठा डाव! उत्तर प्रदेशात 2027 च्या निवडणुकीसाठी ‘गेमचेंजर’ प्लॅन
कृष्ण बनून सजला, पण गळ्यातील माळच ठरली जीवघेणी; 6 वर्षीय आर्यनचा दुर्दैवी मृत्यू
IMD Alert : महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा महाअलर्ट! ताशी 60 किमी वेगाने वारे
भारताची परकीय गंगाजळी ऑल टाइम हाय! 740.803 अब्ज डॉलरवर विक्रमी झेप
संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग? म्हणाले- ‘टॉक्सिक टेस्ट करणार’
हा मार्ग सध्या ‘मृत्यूचा महामार्ग’ बनल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. रखडलेले काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित व सुकर वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
