अनिस शेख : महान प्रतिनिधी,,
महान येथील कल्पना कॉलनी मधील रहिवाशी दीपक सेवकराम ठाकरे वय 35 वर्ष हा वीज वितरण कंपनी मध्ये कंत्राटी कामगार म्हणून पदावर कार्यरत होता. आज 19 मे रोजी सकाळी 10 वाजता मृतक दीपक सेवकराम ठाकरे हा महान येथून 4 किलो मीटर अंतरावरिल हातोला येथे वीज मीटर जोडणी करिता गेला असता हातोला येथील वार्ड क्रमांक 1 मध्ये येणाऱ्या गावठाण समोरील विष्णू हातोलकर यांच्या निवासस्थानाच्या बाजू ला असलेले वीज खांबावर दीपक हा मीटर चे तार जोडणी करिता खांबावर चढला होता. तार जोडणी काम सुरू असताना मृतक दीपक ठाकरे च्या हाताचा वीज तारांना स्पर्श झाल्याने दीपक हा खांब्यावरून खाली फेकल्या गेला.वीज खांबाच्या खाली सिमेंट काँक्रिट ची मोठी नाली होती.त्या नालीवर मृतक दीपक हा डोक्यावरती पडल्याने त्याच्या डोक्यावर जबर मार लागल्याने त्याच्या डोक्यातून आणि कानातून रक्तस्राव सुरू झाला होता.दीपक यास गावातील काही नागरिकांनी उपचाराकरिता महान येथील खाजगी रुग्णालयात आणले असता दीपकची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास त्वरीत अकोला येथील सामान्य रुग्णालयात पाठविले.जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचताच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दीपक ची तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृतक दीपक ठाकरे च्या मृत्यू ची वार्ता पसरताच संपूर्ण महान परिसरात हळहळ व्यक्त झाली असून मृतक दीपक सेवकराम ठाकरे याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर उभा झाला आहे.
5 वर्षीय काव्या चे पितृ छाया हरवले
मनमिळाऊ स्वभावाचा धनी असलेला दीपक हा कोणाही सोबत प्रेमाने वागायचे अन् कोणत्याही समाजातील व्यक्तींच्या दुःखात अग्रेसर राहायचे.मृतक दीपक सेवकराम ठाकरे यास पत्नी आणि एक पाच वर्षीय मुलगी आहे.दीपक हा वीज वितरण कंपनी मध्ये कंत्राटी कामगार म्हणून पदावर कार्यरत होता.आज सकाळी तो आपली पत्नी आणि पाच वर्षीय मुलगी काव्या सोबत बोलून तो आपल्या कामावर घरून निघून गेला होता.घरून निघता वेळी त्याने थोडाफार ही विचार केला नसावा की आज चा दिवस आपल्या परिवारावर दुःखाचा जाणावनार आणि आपल्या लाडक्या काव्याच्या डोक्यावरील पितृछाया नेहमीसाठी हरवणार.
Related News
मृतक दीपक ठाकरे च्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी.
वीज वितरण कंपनी मध्ये कंत्राटी कामगार पदावर कार्यरत असलेल्या आणि “ऑन ड्युटी” वर आपले प्राण गमवणारा दीपक सेवकराम ठाकरे यांच्या परिवाराला वीज वितरण कंपनी ने त्वरीत भरमसाठ मदत द्यावी जेणे करून मृतक दीपक ठाकरे ह्याच्या पत्नी,आणि पाच वर्षीय चिमुकली काव्या हिच्या जगण्यासाठी आणि पुढील शिक्षणासाठी कोणतीही अडी अडचण जाणवणार नाही.अशी मागणी समस्त महान वासियांसह परिसरातील जनतेने केली आहे.
मृतक दीपक ह्यास पत्नी,एक मुलगी,आई,वडील,भाऊ,आणि एक बहीण असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनी चे अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालयात
मृतक दीपक सेवकराम ठाकरे यांच्या मृत्यू ची माहिती मिळताच अकोला वीज वितरण कंपनी चे संबंधित अधिकारी आणि बार्शिटाकळी,महान,धाबा,येथील कनिष्ठ अभियंता सह लाईनमन,हेल्पर सह वीज वितरण कंपनीच्या अन्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेऊन मृतक दीपक ठाकरे ची पाहणी करून दुःख व्यक्त केला.
शवविच्छेदन नंतर अंतिम संस्कार
मृतक दीपक सेवकराम ठाकरे याच्या शवाचे शवविच्छेदन झाल्यावर त्याच्या पार्थिवावर मूळ गावी खोपडी येथे रात्री 7.30 वाजता हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले आहे.
