अमरावती: स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरवाडी परिसरात मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तीन तरुणांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत एकूण १ लाख १८ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये अमली पदार्थ, दुचाकी आणि मोबाइल फोनचा समावेश आहे.
ही कारवाई १७ मे रोजी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सागर हटवार हे नियमित पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली होती की चांदूर बाजार परिसरातील राजा, साद आणि अनवेज नावाचे तीन तरुण अमरावती शहरातून एमडी ड्रग्ज आणून त्याची विक्री करत आहेत. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने संयुक्त कारवाईची योजना आखली.
एलसीबी आणि चांदूर बाजार पोलिसांच्या संयुक्त पथकाने खरवाडी फाटा परिसरात सापळा रचला. मध्यरात्रीच्या सुमारास एकाच दुचाकीवरून तिघे संशयित तरुण त्या मार्गाने येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली आणि अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एमडी ड्रग्ज सापडले. प्राथमिक तपासणीत हे अमली पदार्थ मेफेड्रोन असल्याचे स्पष्ट झाले असून त्याचे प्रमाण ७.१९० ग्रॅम इतके आहे.
Related News
जीआर आला! मराठा आरक्षणासाठी सरकारचं मोठं पाऊल; शिंदे समितीला नवी जागा
DJ विरोधी भूमिका विद्यानंद बापटांना पडली महागात; हिंदू सेवा संघाची थेट हद्दपारीची मागणी!
BRICS परिषदेत बांगलादेश जाणार नाही? भारताच्या निमंत्रणावर मोठा दावा
‘मी आयुष्यात 22 उपोषणं केली…’; Manoj Jarange Patilच्या आंदोलनावर अण्णा हजारेंचं मोठं वक्तव्य
मनुस्मृतीचं दहन, घोषणांनी नागपूर दणाणलं! युवक काँग्रेसची संघ कार्यालयावर धडक
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर…” Manoj Jarange Patil चा सरकारला थेट इशारा!
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा
“संगीताला बंदी नाही, ढोल-ताशालाही बंदी नाही!” विश्वास नागरे पाटील यांचा मोठा खुलासा
Iran-US War Update : इराणमध्ये लग्न सोहळ्यावर अमेरिकेचा मिसाइल हल्ला; लहान मुलासह 5 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी
रील्सच्या नादात जीवावर बेतलं! पुराच्या पाण्यात अंघोळ करताना दोन महिला वाहून गेल्या
मराठा आंदोलनाला जाताना काळाचा घाला; बीडच्या आंदोलकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
मोठी बातमी! मराठा आंदोलन पुन्हा पेटलं; सोलापुरात मंत्र्यांची गाडी अडवली
या कारवाईदरम्यान पोलिसांनी संबंधित तरुणांकडून वापरण्यात आलेली दुचाकी तसेच मोबाइल फोनही जप्त केला आहे. या संपूर्ण मुद्देमालाची किंमत अंदाजे १ लाख १८ हजार ८७० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या कारवाईत एसपी निकेतन कदम, एसडीपीओ मनीष ठाकरे, एलसीबी प्रमुख किरण वानखडे, प्रभारी अधिकारी सागर भामरे यांच्यासह अंमलदार सचिन मिश्रा, रवींद्र बावणे, बळवंत दाभणे, भूषण पेठे, पंकज फाटे, प्रशिक वानखडे आणि एपीआय विष्णू पांडे यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अमली पदार्थ तस्करीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
