इंडोनेशियात 7.4 तीव्रतेचा भूकंप; 1 मृत्यू, इमारतींचे नुकसान, सुनामीचा इशारा मागे

इंडोनेशिया

इंडोनेशियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ गुरुवारी सकाळी 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. या भूकंपामुळे सुमारे 75 सेंटीमीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या आणि सुरुवातीला सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता, मात्र नंतर तो मागे घेण्यात आला.

US Geological Survey (USGS) यांच्या माहितीनुसार, हा भूकंप मोलुक्का समुद्रात सुमारे 35 किमी उथळ खोलीवर झाला. हा भाग सुलावेसी आणि मलुकू बेटांच्या दरम्यान आहे.उत्तर सुलावेसी प्रांतातील मनाडो शहरात एका इमारतीच्या कोसळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. स्थानिक बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत व्यक्ती ढिगाऱ्याखाली दबली गेली होती, तर आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे.

Pacific Tsunami Warning Center (PTWC) ने सुरुवातीला इशारा दिला होता की, भूकंपाच्या केंद्रापासून 1000 किमी परिसरात — इंडोनेशिया, फिलिपाईन्स आणि मलेशिया किनाऱ्यांवर — धोकादायक सुनामी लाटा निर्माण होऊ शकतात.इंडोनेशियाच्या BMKG या भूकंपविज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मिनाहासा भागात 75 सेंटीमीटर, बिटुंग येथे 20 सेंटीमीटर आणि उत्तर मलुकू प्रांतात 30 सेंटीमीटर लाटा नोंदवण्यात आल्या.

Related News

भूकंपानंतर सुमारे दोन तासांनी PTWC ने सुनामीचा धोका टळल्याचे जाहीर करून इशारा मागे घेतला.स्थानिक नागरिकांनी सांगितले की, भूकंप खूप तीव्र होता आणि एक मिनिटापेक्षा जास्त काळ जाणवत होता. अनेक लोक घाबरून घराबाहेर पळाले.

BMKG प्रमुख टेकू फैसल फथानी यांनी सांगितले की, या भूकंपानंतर 11 आफ्टरशॉक्स (धक्के) नोंदवले गेले, त्यापैकी सर्वात मोठा 5.5 तीव्रतेचा होता.फिलिपाईन्स, मलेशिया आणि जपानने कोणताही सुनामी इशारा जारी केलेला नाही. मात्र जपानच्या हवामान खात्याने समुद्राच्या पातळीत किरकोळ बदल होऊ शकतात, असे म्हटले आहे.इंडोनेशिया आणि आसपासचे देश पॅसिफिक “रिंग ऑफ फायर” या भूकंपीयदृष्ट्या सक्रिय क्षेत्रात येतात, त्यामुळे येथे वारंवार भूकंप होतात.2004 साली इंडोनेशियातील आचेह प्रांतात 9.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर आलेल्या सुनामीत 1.7 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

read also :  https://ajinkyabharat.com/2-years-of-imprisonment-delayed-naseem-shahs-career-big-twist-due-to-the-last-minute-decision-of-vachlan-mohsin-naqvi/

Related News