हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची
दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत २१ जागांसाठी
उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दोन मुस्लीम उमेदवारांनाही
Related News
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अकोटात सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
तिकीट देण्यात आले आहे. आतापर्यंत भाजपने हरियाणातील ९० पैकी
८८ जागांसाठी उमेदवार घोषित केले आहे. पहिल्या यादीत ६७ जागांसाठी
उमेदवार जाहीर करण्यात आले होते. अद्याप दोन जागांवर उमेदवारी
घोषित करणे बाकी आहे. भाजपने फिरोजपूर झिरका मतदारसंघातून
नसीम अहमद आणि पुन्हाणा मतदारसंघातून एजाज खान यांना उमेदवारी
दिली आहे. याशिवाय, जुलाना जागेवर भाजपने कॅप्टन योगेश बैरागी यांना
उमेदवारी दिली आहे. या जागेवर कुस्तीपटू विनेश फोगट काँग्रेसच्या तिकीटावर
येथून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने पेहोवा जागेवर उमेदवार बदलला
आहे. याआधी भाजपने कंवलजीत सिंह अजराना यांना तिकीट दिले होते. मात्र,
विरोध असल्याने त्यांनी तिकीट परत केले. आता भाजपने या जागेसाठी जय भगवान
शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
मतदारसंघ आणि उमेदवार-
नारायणगड – श्री पवन सैनी
पेहोवा- जय भगवान शर्मा (डीडी शर्मा)
पुंडरी – सतपाल जांबा
असांध – योगेंद्र राणा
गणौर – देवेंद्र कौशिक
राई – कृष्णा गेहलावत
बरोदा – प्रदीप सांगवान
जुलाना – कॅप्टन योगेश बैरागी
नरवाना (SC)- कृष्णकुमार बेदी
डबवाली – सरदार बलदेवसिंग मलियाना
एलेनाबाद – अमीर चंद मेहता
रोहतक मनीष ग्रोवर
नारनौल – ओम प्रकाश यादव
बावल (अजा) – डॉ. कृष्ण कुमार
पटौदी (अजा) – बिमला चौधरी
नूंह – संजय सिंह
फिरोजपुर झिरका – नसीम अहमद
पुन्हाना – ऐज़ाज़ खान
हथिन – मनोज रावत
होडल (अजा) – हरिंदर सिंह रामरतन
बड़खल – धनेश अदलखा
Read also: https://ajinkyabharat.com/internet-service-closed-in-manipur-for-five-days/