महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या चार उमेदवारांची घोषणा केली असून यात Ramdas Athawale, Vinod Tawde, Maya Chintaman Ewanate आणि Ramrao Wadkute यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून यावेळी राज्यसभेच्या एकूण सात जागांसाठी निवडणूक होणार असून विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे महायुतीला स्पष्ट आघाडी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपचे चार उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, Election Commission of India ने देशातील 10 राज्यांमधील एकूण 37 राज्यसभा जागांसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. रिक्त होणाऱ्या जागांपैकी 12 जागा एनडीएकडे तर 25 जागा विरोधी पक्षांकडे आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक सात जागांसाठी निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रानंतर Tamil Nadu मध्ये 6 तर West Bengal आणि Bihar या राज्यांमध्ये प्रत्येकी पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेतील काही महत्त्वाच्या सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. यात Sharad Pawar, Ramdas Athawale, Priyanka Chaturvedi, Rajni Patil, Bhagwat Karad आणि Dhairyashil Patil यांचा समावेश आहे. त्यामुळे या जागांसाठी होणारी निवडणूक राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Related News
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च होती. 6 मार्च रोजी अर्जांची छाननी करण्यात आली असून उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर केले जातील.
महाराष्ट्रातील संख्याबळाचे गणित
महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 जागा आहेत. मात्र दोन आमदारांच्या निधनामुळे सध्या 286 आमदार आहेत. राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला किमान 37 मतांची आवश्यकता आहे. यासाठीचा कोटा पुढील सूत्रानुसार ठरतो – एकूण आमदार (286) भागिले रिक्त जागा + 1 (7 + 1) आणि त्यात पुन्हा 1 जोडले जाते.त्यामुळे 286 ÷ 8 = 35.75 आणि त्यात 1 जोडल्यास 36.75 म्हणजेच प्रत्यक्षात 37 मतांची गरज भासते. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला विजयी होण्यासाठी किमान 37 आमदारांचे मत मिळणे आवश्यक आहे.
पक्षनिहाय संख्याबळ
विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ पाहिल्यास भाजपकडे 132 आमदार होते. त्यातील एका आमदाराच्या निधनामुळे सध्या 131 आमदार आहेत. Shiv Sena या शिंदे गटाकडे 57 आमदार आहेत. Nationalist Congress Party कडे 41 पैकी एका आमदाराच्या निधनामुळे 40 आमदार आहेत.विरोधी पक्षांकडे पाहिल्यास Indian National Congress कडे 16, Nationalist Congress Party कडे 10 आणि Shiv Sena कडे 20 आमदार आहेत. याशिवाय Samajwadi Party चे 2, Communist Party of India (Marxist) चा 1 तसेच काही छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार आहेत.महायुतीमध्ये भाजप, शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी तसेच काही छोटे पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा मिळून सुमारे 234 आमदारांचे संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट यांच्यासह एकूण 49 आमदार आहेत.
कोणाला किती जागा?
भाजपकडे 131 आमदार असून एका अपक्षाचा पाठिंबा मिळून त्यांच्याकडे 132 मते आहेत. 37 मतांचा कोटा लक्षात घेतल्यास भाजपचे किमान तीन आणि शक्यतो चार उमेदवार निवडून येऊ शकतात. शिंदे गटाकडे 58 मते असल्याने त्यांचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो आणि सुमारे 20 मते अतिरिक्त राहतात.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 40 आमदार असल्याने त्यांचाही एक उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे 49 आमदारांचे संख्याबळ असल्याने त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.या गणितानुसार महायुतीचे भाजपचे तीन ते चार, शिंदेसेनेचा एक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक असे किमान पाच उमेदवार निवडून येऊ शकतात. उर्वरित अतिरिक्त मतांवरून सहाव्या जागेवरही महायुतीचीच बाजू मजबूत असल्याचे दिसते.
राज्यसभा सदस्यांची निवड कशी होते?
राज्यसभा ही संसदेतली उच्च सभागृह असून त्यामध्ये एकूण 250 सदस्यांची तरतूद आहे. यापैकी 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, तर उर्वरित 238 सदस्य राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात. राज्यांना मिळणाऱ्या जागा त्या राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरवल्या जातात.
राज्यसभा सदस्यांची निवड विधानसभेतील आमदारांकडून प्रमाण प्रतिनिधित्व पद्धतीने केली जाते. या पद्धतीमध्ये आमदार उमेदवारांना प्राधान्यक्रमानुसार मत देतात. जर एखाद्या उमेदवाराला आवश्यकतेपेक्षा जास्त मते मिळाली किंवा एखादा उमेदवार स्पर्धेत राहू शकत नसल्यास त्यांची मते पुढील प्राधान्यक्रमानुसार इतर उमेदवारांकडे हस्तांतरित केली जातात.महाराष्ट्रातील सात जागांसाठी होणारी ही निवडणूक आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाची मानली जात असून 16 मार्चला होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
