बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. किरकोळ अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात १ लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणलेला खून असल्याचे तपासात स्पष्ट झाले. जळगाव जामोद पोलिसांच्या तपासामुळे या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
२ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे पावणे सातच्या सुमारास कवठळ गावाजवळ पांढऱ्या रंगाच्या ‘टाटा इंट्रा’ गाडीने वृषाली प्रकाश गावंडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या धडकेत वृषाली गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत होते, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केल्यानंतर या घटनेमागील धक्कादायक सत्य समोर आले.
ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपास करताना संशयाची सुई पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा (MH 28 BB 5753) गाडीकडे वळली. तपासादरम्यान ही गाडी शेगाव येथील मनीष नारायणसिंग सुर्यवंशी याची असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खुनाच्या कटाची कबुली दिली.
Related News
Dombivli News: धक्कादायक VIDEO! लिफ्टच्या वीजबिलावरून सोसायटीत तुफान हाणामारी; 2 गटांवर गुन्हे दाखल
Nashik Crime: 7 धक्कादायक तथ्ये! सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने नाशिक हादरले
पुण्यातील हायप्रोफाईल सोसायटीत 4 मोबाईल चोरी, रहिवाशांची झोप उडाली; पोलिसांचा मोठा तपास सुरू
5 धक्कादायक खुलासे! बीडमध्ये अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता, प्रशासनात खळबळ
अकोल्यात भरचौकात तरुणाची निर्घृण हत्या; जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला
कौटुंबिक वादातून आईने स्वतःसह 4 मुलांना विष पाजले; रायगडमध्ये काळीज पिळवटणारी घटना!
बदलापूरमध्ये रक्तरंजित थरार! 48 वारांनी महिलेचा खून, नंतर आरोपीने स्वतःवर 8 वार
ZP शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू; 10 ते 15 जणांच्या जमावावर गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?
भिवंडीत 1 तोतया FDA अधिकाऱ्यांचा धक्कादायक प्रकार, लाखोंची वसूली करणारी टोळी उघडी पडली!
ठाण्यातील धक्कादायक दुहेरी हत्याकांड: Instagram वादातून 19 वर्षीय तरुणाचा क्रूर खून, 5 मोठे खुलासे
7 वर्षांच्या बालकासोबत मशिदीत अश्लील चाळे; CCTV पुराव्यानंतर आरोपीला अटक
तपासात समोर आले की, मृत वृषाली गावंडे यांचे पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्याचा साथीदार मंगेश चुलकार (रा. पातुर्डा) यांनी मिळून हा कट रचला होता. यापूर्वी वृषाली यांना अन्नातून विष देऊन मारण्याचा तीन वेळा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तो अयशस्वी ठरला. अखेर आरोपींनी मनीष सुर्यवंशी याला १ लाख रुपयांची सुपारी देऊन गाडीने उडवून खून करण्याचा कट रचला.
ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजी सकाळी मनीषने वृषाली यांच्या दुचाकीचा पाठलाग केला आणि गाडीने मागून धडक देत त्यांना खाली पाडले. या धडकेत वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणात वाहन चालक मनीष नारायणसिंग सुर्यवंशी, मध्यस्थ मंगेश चुलकार आणि मृत महिलेचे पती प्रकाश अनंता गावंडे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ६१(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत.
