भाजप खासदार तथा अभिनेत्री कंगना राणावतला अखेर तिच्याच पक्षाने
घरचा आहेर दिला आहे. कंगना राणावतने शेतकरी आंदोलनाबाबत
केलेल्या वक्तव्यावर भाजप पक्षाने तिचे कान टोचले आहेत.
Related News
राज्यात आरक्षणावरून संघर्ष; OBCना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा डाव असल्याचा नाना पटोलेंचा गंभीर आरोप
राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण पुन्हा एकदा तापले असून मराठा आणि
Continue reading
Manoj Jarange Patil चा ‘प्लान बी’! मुंबईत आंदोलकांना त्रास झाल्यास जिल्ह्याजिल्ह्यात ठिय्या आंदोलन; दिल्या थेट सूचना
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
Continue reading
Gold-Silver Price : सोनं-चांदी खरेदीची संधी? दोन दिवसांत मोठी घसरण; अमेरिकेतील महागाईचा बाजारावर परिणाम
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ...
Continue reading
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा; 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान यलो अलर्ट, 15 सप्टेंबरपासून जोर वाढणार
Maharashtra Rain...
Continue reading
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांना हात लावाल तर… अभिजीत दिपकेंचा सरकारला ओपन चॅलेंज; म्हणाले, “महाराष्ट्र इथं येईल!”
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
Continue reading
Health Tips : चाळीशीनंतरही दिसाल तरुण! ‘हे’ 5 पदार्थ आहारात ठेवा; आरोग्य राहील उत्तम
Health Tips : वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र वाढत्...
Continue reading
S-400 नंतर आता Su-57Eची तयारी? पुतिन भारताला देणार अत्याधुनिक शस्त्रांची ऑफर!
प...
Continue reading
Vinesh Phogatला मोठा झटका; दिल्ली उच्च न्यायालयाने निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाकारली
भारताची स्टार कुस्तीपटू Vinesh Phogat हिला...
Continue reading
DJ विरोधातील भूमिकेवरून विद्यानंद बापट चर्चेत; हिंदू सेवा संघाची हद्दपारीची मागणी
गणेशोत्सवातील DJ आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याच्य...
Continue reading
Bank Account Rules: एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत? जास्त खाती ठेवल्यास काय समस्या येऊ शकतात?
Bank Account Rules: आजच्या काळात बहुत...
Continue reading
QR कोड स्कॅनची गरज नाही! UPI चे ‘Tap & Pay’ फीचर कसे काम करणार? Google Pay-PhonePe वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट
UPI New Tap And Pay...
Continue reading
विशेष म्हणजे भाजपन अधिकृतपणे पत्र जाहीर करत याबाबत
भूमिका मांडली आहे. कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा भाजप
पक्षाशी काहीच संबंध नाही, असं भाजपने अधिकृत पत्र जाहीर करत
म्हटलं आहे. कंगना राणावतने व्यक्त केलेले मत हे तिचं व्यक्तिगत
मत आहे. शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर बलात्कार झाले होते,
असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. तिच्या या वक्तव्यावर भाजपने भूमिका
जाहीर केली आहे. “भाजप खासदार कंगना राणावत यांनी शेतकरी
आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. कंगना राणावत
यांच्या विधानावर भारतीय जनता पक्षाने असहमती व्यक्त केली आहे.
पक्षाच्या वतीने, कंगना राणावत यांना पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर
विधाने करण्याची परवानगी किंवा अधिकृतता नाही”, असं भाजपने म्हटलं आहे.
“भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंगना राणौत यांना भविष्यात
असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारतीय जनता पक्षाचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास
आणि सबका प्रयास’ आणि सामाजिक समरसता या तत्त्वांचे पालन
करण्याचा निर्धार आहे”, असं भाजपने स्पष्ट केलं आहे.
“शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या.
बरं झालं केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे
मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते”,
असं वक्तव्य कंगनाने केलं होतं.
Read also: https://ajinkyabharat.com/emergency-movie-throne-khaali-karo-song-audience-bhetila/