पातुर तालुक्यातील खेट्री येथील साहित्यिक प्रवीण जगन्नाथ बोपुलकर यांचे साहित्यिक कार्य महाराष्ट्रात आणि विदर्भात विशेष मान्यतेस पात्र ठरले आहे. त्यांच्या प्रसिद्ध कथासंग्रह ‘वाळन’ ला मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे, हा कथासंग्रह आता बी. ए. भाग-२ (सत्र ४) च्या मराठी साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. या ग्रंथाचा प्रकाशन राघव पब्लिकेशन द्वारे ‘वैदर्भीय कथा’ या संकलनात झाला असून, संपादक म्हणून डॉ. गणेश मालटे, डॉ. गजानन मुंदे आणि डॉ. राजेश मिरगे यांनी काम केले आहे. याशिवाय, सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. माधव पुटवाड यांनी या ग्रंथाला प्रस्तावना लिहून त्याची महत्त्वपूर्णता अधोरेखित केली आहे.
‘वाळन’ कथासंग्रह ग्रामीण जीवनातील वास्तव, मानवी नातेसंबंधातील सूक्ष्म भावविश्व, सामाजिक जाणिवा आणि जीवनातील विविध वळणांचे संवेदनशील चित्रण करून वाचक व समीक्षकांचे लक्ष वेधून घेतो. प्रवीण बोपुलकर हे प्रशासकीय सेवेत कार्यरत असूनही सातत्याने साहित्य साधनेत सक्रिय आहेत. त्यांच्या साहित्यसंपदेत ‘अवतरण चिन्ह’ या कविता संग्रहासह ‘वाळन’ या कथासंग्रहाचा समावेश आहे.
सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल या संस्थेचे संस्थापक म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये साहित्यिक उपक्रम राबविले आहेत. तसेच, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांसह अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित कवी व गझलकार म्हणून सहभाग नोंदवत त्यांनी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मान प्राप्त केले आहेत.
Related News
प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर यांनी 'फुलवा' नावामागील भावनिक आणि प्रेरणादायी कथा सांगितली. वडिलांना मित्रांनी हे नाव अपशकुनी असल्याचे सांगितले होते, मात्र त्यांनी मुलीचे नाव 'फु...
Continue reading
पावसाळ्यात सापांचा धोका का वाढतो?
पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी साचते. त्यामुळे ते कोरड्या आणि सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात. घरातील अंधारे कोपरे, लाकडांचे ढीग, धान्य...
Continue reading
70 फूट खोल विहिरीत कोसळली बैलजोडी; ग्रामस्थांच्या थरारक प्रयत्नांनी सर्जा-राजाचा जीव वाचला
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी गावात रविवारी सकाळी घडल...
Continue reading
इंटरनेटशिवाय रंजक राहण्याची कला Gen Z विसरत आहे का?; नव्या पिढीबद्दलची चर्चा पुन्हा ऐरणीवर
Gen Z इंटरनेटशिवाय कंटाळवाणी होत आहे का? कल्पना करा, वर्ष २००९ आहे. संध्याकाळची वेळ. सं...
Continue reading
कवितेच्या नव्या वाटेवर ‘काजळकाठ’चा प्रभाव; साहित्यविश्वातील मान्यवरांकडून उत्स्फूर्त दाद
मराठी साहित्यविश्वात गेल्या काही वर्षांत अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले. मात्र त्यामध्ये ...
Continue reading
आज, २७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा दिवस मराठी भाषेचा अभिमान आणि समृद्ध परंपरा जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मान...
Continue reading
अकोट : शहरातील सांस्कृतिक कलाभवन येथे जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ पार पडला. वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या ग्रंथोत्सवात साहित्यप्रेमी, विद्यार्थी आण...
Continue reading
अकोट : शासकीय सार्वजनिक वाचनालय अकोट यांच्या वतीने आयोजित जिल्हा वार्षिक ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथ साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथद...
Continue reading
Dr. Manohar घुगे यांना ‘कलाविष्कार साहित्य’ पुरस्काराने सन्मान
मराठी साहित्य क्षेत्रातील योगदानाचा राज्यस्तरीय गौरव
सामाजिक व साहित्य क्षेत्रात भरीव आणि सातत्यपूर्ण योगदान देणारे...
Continue reading
मुक्ता पब्लिकेशनचे प्रकाशक sagar लोडम यांचा विदर्भ साहित्य संघातर्फे गौरव
अकोला : मराठी साहित्याच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी सातत्याने कार्य करणारे मुक्ता पब्लिकेशनचे प्रकाशक...
Continue reading
मूर्तिजापूर: सामाजिक सलोखा, जनसेवा आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मूर्तिजापूर येथील प्रा. सुधाकर गौरखेडे यांची ‘मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, कोल्हापूर’ आयोजित मान...
Continue reading
नवी दिल्ली – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (एमजीएनआरईजीए) हा देशातील ग्रामीण भागातील कामगारांसाठी सर्वात महत्वाचा रोजगार हमी योजना मानली जाते. या योजनेच्या माध्य...
Continue reading
संत गाडेगाबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘वाळन’चा समावेश हा त्यांच्या साहित्यिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या कथासंग्रहामध्ये ज्येष्ठ कथाकार उद्धव शेळके, भाऊ मांडवकर, नामदेव कांबळे, बाबाराव मुसळे, प्रतिमा इंगोले, पुरुषोत्तम बोरकर, सतीश तराळ, सदानंद देशमुख, अशोक मानकर, एकनाथ तट्टे यांसारख्या मातब्बर साहित्यिकांसोबत प्रवीण बोपुलकर यांचे स्थान मिळाल्याने, साहित्यप्रेमींमध्ये आनंद आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.
read also : https://ajinkyabharat.com/marathi-language-pride-day-celebrated-with-enthusiasm-at-st-pauls-academy-akot/