लोणार (जांभोरा प्रतिनिधी) : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात गंभीर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. उबाठा शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांच्यावर गावातील काही जणांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
संजीवनी वाघ यांनी आरोप केला आहे की, गावचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणी दरम्यान त्यांच्या अंगावरील कपडेही फाडण्यात आले. यासंदर्भातील काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये ही घटना उघडपणे घडताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
या प्रकरणामागे गावात काही दिवसांपूर्वी बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा वाद असल्याचे समोर आले आहे. अज्ञात व्यक्तींनी हा पुतळा उभारला होता. मात्र, तो हटवण्याचा प्रयत्न सरपंचांकडून होत असल्याचा आरोप आहे. याला संजीवनी वाघ यांनी विरोध केल्यामुळेच हा हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले.
Related News
पुण्यात भीषण दुर्घटना: पिंपरी-चिंचवडमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली, 14 जण अडकल्याची धक्कादायक भीती | 5 मोठे अपडेट्स
3 तास बंद दाराआड अमित शाह-देवेंद्र फडणवीस बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या निर्णयांची चाहूल?
धक्कादायक! भांडुपमध्ये BEST बसचा भीषण अपघात; 43 वर्षीय पादचारी जखमी, 3 वाहनांचे नुकसान
मोठा राजकीय भूकंप! शरद पवार महायुतीत जाणार? 7 मोठे संकेत, जयंत पाटील-विनोद तावडे बैठकीने वाढवल्या चर्चा
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील भीषण पावसाचा कहर! 24 तासांत 513 मिमी विक्रमी नोंद, अतिट गावात ढगफुटीसदृश्य परिस्थिती
तुकाराम मुंडेंचा धडाका; 1125 किलो संशयित दूध पावडर जप्त, 2.11 लाखांचा साठा ताब्यात
मावळ दरड दुर्घटना : 1 कुटुंबातील 3 जणांचा करुण अंत; वर्षभरापूर्वीच लग्न झालेल्या तरुणाचा मृत्यू, गरोदर पत्नी बचावली
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण संकट! मिसिंग लिंकवर दरड कोसळली, 3 तास वाहतूक बंद
धक्कादायक खुलासा! ११ वर्षांच्या मुलीवर वारंवार अत्याचार; ६ महिन्यांची गर्भधारणा उघड, आरोपी परदेशात फरार
मावळात भीषण दरड दुर्घटना! 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू, NDRFचे 30 जवान बचावकार्यात; ‘माळीण’ची वेदनादायी पुनरावृत्ती
7 सप्टेंबरला उबाठाचे 15 आमदार जाणार? हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद
“मी पुतळा हटवण्यास विरोध केला, त्यामुळे मला लक्ष्य करण्यात आले. पोलिसांसमोरच माझ्यावर हल्ला झाला आणि माझे कपडे फाडण्यात आले,” असे संजीवनी वाघ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर संजीवनी वाघ यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर धक्कादायक इशारा दिला आहे. “सगळं संपलं आहे. उद्या सकाळी ७ वाजता मी आत्महत्या करणार आहे,” असे त्यांनी स्टेटसमध्ये लिहिले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
