संजय गांधी निराधार वृद्ध पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा मिळणारी पंधराशे रुपयांची मदत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अपुरी ठरत असल्याची भावना निराधार वृद्धांकडून व्यक्त होत आहे. वीज बिल, गॅस सिलेंडर, औषधे, मोबाईल रिचार्ज आणि दैनंदिन अन्नखर्च भागवताना या रकमेवर महिनाभर संसार चालवणे कठीण होत असल्याची व्यथा लाभार्थ्यांनी मांडली आहे.
वृद्धांचे म्हणणे आहे की, महिन्याचे वीज बिलच अनेकदा ३०० ते ५०० रुपयांपर्यंत जाते. गॅस सिलेंडरचा दर हजार रुपयांच्या आसपास पोहोचल्याने तो भरल्यानंतर इतर आवश्यक खर्चासाठी पैसे उरत नाहीत. वयोमानामुळे औषधांचा नियमित खर्च करावा लागतो, ज्यासाठी दरमहा काहीशे रुपये लागतात. संपर्कासाठी मोबाईल आवश्यक असल्याने त्याचा खर्चही टाळता येत नाही. परिणामी उरलेल्या रकमेवर अन्नखर्च भागवणे मोठे आव्हान ठरत आहे.
निराधार लाभार्थ्यांनी शासनाकडे पेन्शन रकमेचा पुनर्विचार करून ती वाढवण्याची मागणी केली आहे. “मिळणारी मदत ही प्रत्यक्ष जीवन जगण्यासाठी पुरेशी असावी. वाढत्या महागाईचा विचार करून शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,” अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Related News
LPG Gas Cylinder : गॅस सिलिंडरच्या टंचाईवर भारताचा मोठा डाव! अमेरिकेकडून LPG आयातीत तब्बल 254% वाढ
देशातील LPG Gas Cylinder च्या पुरवठ्याबाबत मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली ...
Continue reading
Rule Change: LPG ते विमानतळापर्यंत…! 1 सप्टेंबरपासून देशात होणार 5 मोठे बदल; काय काय महागणार?
ऑगस्ट महिना आता अखेरच्या टप्प्यात असून, अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 1 सप्टेंबरपासून द...
Continue reading
LPG Cylinder: LPG चा प्रश्न कायमचा सुटणार? सरकारच्या निर्णयामुळे पाइपद्वारे स्वस्त गॅस मिळण्याची शक्यता
LPG Cylinder News : घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या खर्चामुळे त्रस्त अ...
Continue reading
LPG Cylinder Price: 200 रुपयांनी स्वस्त झाला व्यावसायिक गॅस सिलेंडर; आता कितीला मिळणार? जाणून घ्या नवीन दर
महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांसाठी मोठी आ...
Continue reading
LPG Cylinder Rules : LPG ग्राहकांसाठी मोठी अपडेट! हा मॅसेज दाखवल्याशिवाय घरपोच मिळणार नाही सिलेंडर; 1 ऑगस्टपासून बदलणार मोठे नियम
1 ऑगस्टपासून LPG ग्राहकांसाठी नवे नियम; e-KYC, OT...
Continue reading
Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींचे पैसे आता बंद? जळगावातील 2 हजार महिलांनी स्वतःहून नाकारला लाभ; जाणून घ्या नेमकं कारणएकावेळी एकाच शासकीय योजनेचा लाभ घेण्या...
Continue reading
Rule Change : फक्त तीन दिवस बाकी! 1 ऑगस्टपासून होणार मोठे बदल; हे 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर वाढणार ताण?
फक्त 3 दिवस बाकी! 1 ऑगस्टपासून बदलणार हे 5 मोठे नियम : जुलै महिना आता स...
Continue reading
Petrol Diesel Rate: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; पेट्रोल-डिझेल महागणार? जाणून घ्या आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी चढ-उतार पाहायला मि...
Continue reading
Iran America War Impact : इराणची होर्मुझ खाडी बंद करण्याची धमकी; जगात खळबळ, भारताच्या LPG पुरवठ्यावर संकटाची शक्यता
इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता संघर्ष आता जागतिक अर्थव्यवस्थ...
Continue reading
LPG Gas Price Increase : 29 रुपयांची वाढ, जाणून घ्या 4 महत्त्वाचे नियम; तुमचे कनेक्शन बंद होऊ शकते
LPG Price Hike : LPG नंतर PNG च्याही किमती वाढणार? 29 रुपयांच्या दरवाढीनंतर ग्रा...
Continue reading
महागाईचा भडका! LPG सिलिंडर 29 रुपयांनी महाग, महाराष्ट्रात नवा दर 941.50 रुपये; तीन महिन्यांत तब्बल 89 रुपयांची वाढ
मुंबई, 7 जून 2026: देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी ...
Continue reading
20% दरवाढ लागू, केस कटिंग आणि दाढीसाठी आता मोजावे लागणार अधिक पैसे
मुंबई : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित आधीच बिघडले असताना आता आणखी एक महत्त्वाची सेवा महा...
Continue reading
लाभार्थी उमाबाई गवळी म्हणाल्या, “आता शरीराने कोणतेच काम होत नाही आणि उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. सरकारकडून मिळणारे पंधराशे रुपये महिन्याच्या सुरुवातीलाच संपतात. वीज बिल, औषधे आणि गॅस भरल्यानंतर जेवणासाठी पैसे उरत नाहीत. महागाईमुळे जगणे कठीण झाले असून पेन्शन वाढवून निराधार वृद्धांना दिलासा द्यावा.”
read also : https://ajinkyabharat.com/garibacha-cashew-ratshela-shengdana-mahag-mahashivaratri-purvi-darat-vikrami-vadh/