अकोट : अकोला जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्हा परिषद अकोला आरोग्य विभागाने महत्त्वाचे आणि कठोर पाऊल उचलले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहूनच सेवा देण्याचे आदेश वारंवार देऊनही त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत संबंधितांकडून दोन दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या (जा.क्र. ४६१ व ४६१२/२०२६) पत्रांमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, अनेक नागरिकांकडून डॉक्टर मुख्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. तसेच स्थानिक वृत्तपत्रांमध्येही याबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध झाल्याने प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. यापूर्वीही २०२३ आणि २०२५ मध्ये सूचना देणारी अनेक पत्रे पाठवण्यात आली होती; मात्र परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसून आली नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात राहून मातृ व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, आपत्कालीन प्राथमिक उपचार, संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण, कुटुंब नियोजन, आरोग्य जनजागृती यांसह एकूण १३ प्रकारच्या अत्यावश्यक सेवा देणे बंधनकारक आहे. डॉक्टर मुख्यालयात राहत नसल्यास रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो.
Related News
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोल्यात कृषिमंत्र्यांचा सत्कार; पंचनामे आणि अहवाल...
Continue reading
लोकप्रतिनिधींचा काजू-बादामावर ताव; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, प्रशासनाला सुनावले
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू असताना काजू-बादाम खातानाचा व्हिडीओ ...
Continue reading
DJ मुळे मंत्र्यालाच ऐकू येणे कमी; गुलाबराव पाटलांचा धक्कादायक अनुभव, गणेशोत्सवात डीजे न वाजवण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डीजेच्या मोठ्या आवाजाचा मुद्दा पुन्...
Continue reading
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर...” Manoj Jarange Patil चा निर्वाणीचा इशारा; अंतरवालीत वातावरण तापलं
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला असून, मराठा ...
Continue reading
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी आणि फोटोग्राफरचे विमान झ्युरिकला डायव्हर्ट; तांत्रिक बिघाडामुळे सहा अधिकारी अडकले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवसीय लं...
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा महासंकट! पुरानंतर काठमांडू हादरले; ५.० तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती
Nepal : आधी विध्वंसक पूर आणि भूस्खलनाच्या संकटातून सावरणाऱ्या नेपाळला आता भूकंपाचा...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
मुंबई : राज्यभरात आ...
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
राज्यात मतदार यादीचा मुद्दा पेटला; बीडमधील 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
राज्यात मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य ...
Continue reading
अक्कलदाढ पडल्यावर ती पुन्हा उगवत नाही, आता म्हातारपणात...; मनोज जरांगेंचा भुजबळांवर घणाघाती हल्लाबोल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक Manoj Jarange Patil यांनी पुन्हा ...
Continue reading
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
Continue reading
या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राचा केंद्रनिहाय अहवाल, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नावे नमूद करून, दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनाही प्रत्यक्ष शहानिशा करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अहवालात गैरहजेरी किंवा नियमभंग आढळल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांची कार्यक्षमता वाढेल आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/scout-guide-movements-human-ghadvanare-teaching-rendered-by-aa-prakash-bharsakale/