मुर्तिजापुरमध्ये राष्ट्रीय युवा सप्ताह व स्व. खाशाबा जाधव जयंती उत्साहात साजरी
मुर्तिजापुर: मेरा युवा भारत केंद्र, अकोला यांच्या वतीने तसेच युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकारच्या सहकार्याने स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा सप्ताह तसेच स्व. खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नेहरू युवा बहुउद्देशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कोकणवाडी आणि मेरा युवा भारत तालुका समन्वयक विलास वानखडे यांनी या कार्यक्रमासंबंधी रीतसर माहिती दिली.
कार्यक्रमामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रसार करण्यावर विशेष भर देण्यात आला. आजच्या युवकांच्या जीवनशैलीत मोबाईलचे व्यसन, मानसिक ताण-तणाव, डिप्रेशन आणि इतर समस्यांचा उल्लेख करत, उपस्थितांना त्यांचे जीवन घडवण्यासाठी विवेकानंदांच्या सकारात्मक विचारांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. युवकांनी आत्मसात करावे असे गुणधर्म आणि सामाजिक जबाबदारी यावर भर देण्यात आला.
Related News
सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवरून नवा वाद; पत्नी गीतांजली आंग्मो यांची हायकोर्टात धाव, उपचार आणि मेडिकल रिपोर्टवर गंभीर प्रश्न
Sonam Wangchuk News : लडाखचे सामाजिक कार्यकर्...
Continue reading
Sonam Wangchuk Health Update : 17 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; दिल्ली हायकोर्टाची केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस
सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम...
Continue reading
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा चेहरा म्हणजे शिव ठाकरे, जो 'बिग बॉस मराठी'चा विजेता म्हणून ओळखला जातो. त्यानंतर हिंदी 'बिग बॉस'मध्येही त्याने पह...
Continue reading
मनोज जरांगे पाटील पंढरपूरमध्ये सक्रिय; मारहाण आणि सुपारीसह गंभीर आरोप
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे समाजसेवक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंढरपूर येथे झालेल्या...
Continue reading
हिरपूर येथील जिद्दी, मेहनती व कणखर युवक हर्षल गजानन सराटे याची सीमा सुरक्षा दलात (बी.एस.एफ.) निवड झाल्याने हिरपूर गावासह परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामी...
Continue reading
अकोला – ग्राहक संरक्षण संघ खेडकर नगरच्या कार्यालयात स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सभेचे अध्यक्ष सुधाकर गाडगे यांनी कार्यक्रमाचे उद्बोधन केले. या वेळी स्...
Continue reading
यवतमाळ,दि.१५ जानेवारी —
क्रांतिकारी कवी,दलित पँथर चळवळीचे संस्थापक पँथर नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज दिनांक १५ जानेवारी (गुरुवार) रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता यवतमाळ श...
Continue reading
मुर्तिजापूर – संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते दीपक दांदळे यांनी मुर्तिजापूर शहराचे नामकरण ‘डेबूनगर’ करण्यात यावे, अशी महत्...
Continue reading
प्रतिनिधी : निलेश सपकाळ
हिवरखेड: समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान आणि अपार धार्मिक अंधविश्वास यांविरुद्ध सतत लढा देणाऱ्या संत गाडगेबाबांना भारतरत्न पुरस्काराने गौरवावे, अशी मागणी सामाज...
Continue reading
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भरड्याची वाडी येथे आदिवासी कुटुंबाशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 45 वर्षीय महिलेवर आरोप आहे की, अत्यंत दारिद्र्यातून त...
Continue reading
अंजली दमानिया संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. धनंजय मुंडे, अजित पवार, पार्थ पवार यांच्यावर केलेले आरोप आणि घोटाळ्यांची सविस्तर माहिती जाणू...
Continue reading
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या एकता पदयात्रेच्या संदेशातून “Odisha lost glory” पुन्हा प्राप्त करण्यासाठी देशभर प्रेरणा उभारली आहे. या लेखात त्या “Odisha lost glory” पुनर्...
Continue reading
स्व. खाशाबा जाधव यांच्या जीवनचरित्राची माहिती देखील विस्ताराने दिली गेली. खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२५ रोजी सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर, कराड येथे झाला. त्यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्तीमध्ये वैयक्तिक पदक जिंकून क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आणि राज्याचे नाव उज्वल केले. त्यांच्या कार्याची स्मृती म्हणून त्यांच्या जयंतीस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचे महत्व सांगितले गेले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील क्रीडा शिक्षक, फिटनेस प्रशिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. तालुका क्रीडा कार्यालयाचे विनोद काळबांडे, सर्पमित्र मुन्ना श्रीवास, मेजर फिटनेस अकादमीचे मंगेश तेलमोरे, जी.के. अकादमीचे रवी गोंडकर, फौजी फिटनेस अकादमीचे मंगेश घुगे, सिटी तायक्वोंडोचे दिनेश श्रीवास, तसेच सामाजिक कार्यकर्ते गजानन चव्हाण आणि अक्षय वानखडे यांचा सन्मान करून युवकांना प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी युवा सप्ताहाची सांगता करण्यात आली आणि उपस्थितांनी युवकांच्या सशक्तीकरणावर भर देत स्वामी विवेकानंद आणि खाशाबा जाधव यांच्या जीवनमूल्यांचे अनुसरण करण्याचा संकल्प केला.
read also : https://ajinkyabharat.com/silver-price-crash-2026-silver-price-may-fall-by-up-to-rs-1-lakh-experts-predict/