पँथर नामदेव ढसाळ यांना यवतमाळात अभिवादन , संविधान चौकात स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न

पँथर

यवतमाळ,दि.१५ जानेवारी —
क्रांतिकारी कवी,दलित पँथर चळवळीचे संस्थापक पँथर नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज दिनांक १५ जानेवारी (गुरुवार) रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता यवतमाळ शहरातील संविधान चौक,येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पँथर नामदेव ढसाळ यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून कॉम्रेड नामदेव ढसाळ यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन केले.उपस्थित वक्त्यांनी आपल्या मनोगतातून नामदेव ढसाळ यांचे साहित्यिक व सामाजिक योगदान,दलित पँथर चळवळीची ऐतिहासिक भूमिका तसेच अन्याय-अत्याचाराविरोधातील त्यांचा लढा यावर प्रकाश टाकला.
या अभिवादन कार्यक्रमास त्या काळातील नामदेव ढसाळ यांचे सहकारी कार्यकर्ते गुलाबराव सोळंकी,ऍड.जयसिंग चव्हाण,यशवंत आंबुलकर,सुनील भेले,काशिनाथ गजभिये,कृतिका कुलसंगे,बादल मेश्राम,सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके,युवासेना जिल्हाप्रमुख प्रद्युम्न जवळेकर,शेतकरी चळवळीचे कॉम्रेड सचिन मनवर,शुभम तेलगोटे,शुभम दिवाने,आदित्य बोरेकर,दीक्षांत भगत,प्रा.पंढरी पाठे,यांच्यासह शहरातील विविध पँथर कार्यकर्ते,आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व पँथर प्रेमी उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी कॉम्रेड नामदेव ढसाळ यांचे विचार जिवंत ठेवण्याचा आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

read also :  https://ajinkyabharat.com/multibagger-stock-crorepati-making-stock-3-year-end-amazing-results/

Related News