शेंदुर्जन: काळ बदलला, आयुष्याच्या धावपळीमध्ये प्रत्येकजण गडबडीत होता, तरीही शाळेतील मैत्रीची उब आजही तितकीच घट्ट आहे, याची जाणीव २८ डिसेंबर रोजी शेंदुर्जनमध्ये झाली. वसंतराव नाईक विद्यालय, शेंदुर्जनच्या १९९५-९६ च्या दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांमुळे जणू ‘भावनिक शाळा’च उभी राहिल्याचे चित्र दिसत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेजराव ठोसरे सर होते. सरस्वती पूजन, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त महाराष्ट्रातून नव्हे, तर दुबई व इंग्लंडसारख्या परदेशातूनही माजी विद्यार्थी उपस्थित होते. बारामती, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर यासह एकूण ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
Related News
आलेगाव प्रतिनिधी – आलेगावमधील प्रभा प्रकाश कॉन्व्हेंट शाळेत होळीचा सण यंदा पारंपरिक संस्कृतीसह पर्यावरणजागृती या दोन्ही उद्दिष्टांसाठी उत्साहात साजरा करण्यात आला. “
Continue reading
शेंदुर्जन: सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी मोहीम सुरू; शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
शेंदुर्जन: सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी मोहीम सुरू, शेतकऱ्यांना...
Continue reading
पातूर, दिनांक 26 जानेवारी 2026 – सैय्यद मोहसीन फाउंडेशन व लोकहित शिक्षण प्रसारक मंडळ, पातूर यांच्या संचलनाखालील हाजी सैय्यद अकबर उर्दू प...
Continue reading
मुर्तीजापुर, किनखेड, कामठा – स्व. गुलाबरावजी बांबल विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाचे महत्त्व या विषयावर ...
Continue reading
अकोट तालुक्यातील लोहारी खुर्द येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित त्रिदिवसीय सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभिया...
Continue reading
बोरगाव मंजू – जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ चे मुख्याध्यापक साहेबराव मोरडे यांची नुकतीच बदली झाल्याने शालेय समिती आणि पालक वर्गाच्या...
Continue reading
गांधीग्राम: बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' हे नियतकालिक प्रकाशित करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. त्यांच्या स्मरणार्थ ६ जाने...
Continue reading
लोहारी खुर्द येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली; समाजजागृतीचा संदेश देत तरुणाईची प्रेरणादायी हाक
अकोट – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
Continue reading
अकोट : अकोट पंचायत समिती अंतर्गत जि.प. व प्राथमिक शाळा लोहारी खु. येथे संविधान दिन उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. विविध घोषणांनी...
Continue reading
बाळापूर, ताप्र: शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी जननायक वीर बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती तालुक्यातील विविध शाळा...
Continue reading
सावरा महारुद्र हायस्कूलमध्ये १६ वर्षांनंतर भावनिक गेट-टुगेदर
अकोट : तालुक्यातील सावरा येथील महारुद्र हायस्कूलमध्ये सन २००७ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांच...
Continue reading
कार्यक्रमात शिक्षकांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. ठोसरे सर, आर. के. वाघ सर, एल. एल. वाघ सर, संतोषराव चेके सर, श्याम बोंद्रे सर आणि सुधाकर गायकवाड सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली, तर शिक्षकांनी शिष्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प. दामू अण्णा शिंगणे यांनी केले, सूत्रसंचालन संजय चोपडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम सुरसे यांनी केले. मनोगत, चर्चा व स्नेहभोजनानंतर, पुढील वर्षी पुन्हा भेटण्याचा संकल्प घेऊन सोहळा संपन्न झाला.
read also :https://ajinkyabharat.com/kdmc-election-2026-shinde-gatta-huge-uproar-2-big-leaders-resignations-and-internal-malaise/