शेंदुर्जन: सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी मोहीम सुरू; शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
शेंदुर्जन: सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी मोहीम सुरू, शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहनरब्बी हंगाम २०२५-२६ मधील ई-पीक पाहणीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, अद्याप स्वतःहून पीक नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. महसूल विभागाच्या जाहीर आवाहनानुसार, उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी सात दिवसांच्या आत आपली पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे आणि सिंदखेडराजाचे तहसीलदार श्री. अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. ई-पीक पाहणी हा शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, पीक विमा आणि भविष्यातील मदतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. वेळेत नोंदणी न झाल्यास उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि संभाव्य नुकसानीस सर्व खातेदार जबाबदार राहतील, असा इशाराही महसूल विभागाने दिला आहे.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मंडळ अधिकारी श्री. सर्जेराव साळवे, ग्राम महसूल अधिकारी (शेंदुर्जन भाग १) शिवानंद वाकदकर आणि ग्राम महसूल अधिकारी (शेंदुर्जन भाग २) सुशील शीलवंत विशेष प्रयत्न करत आहेत. गावागावातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महसूल सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेंदुर्जन भाग १ साठी महसूल सेवक श्री. जगदीश पुरी, भाग २ साठी श्री. गजानन मुंडे, तर बाळसमुद्र व शिवणी कंकाळ गावासाठी सेतू केंद्रचालक श्री. पवन मेरत शेतकऱ्यांना सहकार्य करतील.
Related News
मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्...
Continue reading
शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं? कोणती कागदपत्रे लागतात?
Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळ...
Continue reading
मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई; उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
मुंबई : मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू आणि चर्चेत असलेल्या रुस्तुमजी ...
Continue reading
सरकारचा मोठा निर्णय! गव्हाचे पीठ, मैदा आणि रव्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली; चार वर्षांनंतर काय घडलं?
केंद्र सरकारने गव्हाचे पीठ, मैदा, रवा आ...
Continue reading
Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे; विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट!
Maharashtra Cabinet Decisi...
Continue reading
पाय बांधले, डोक्यावर वार; NEET विद्यार्थिनीच्या हत्येने वाराणसी हादरलं, पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये NEET परी...
Continue reading
Manoj Jarange Patil : 58 लाख नोंदी दिल्या, आता कुणबी प्रमाणपत्र द्या; जरांगेंची सरकारसमोर थेट अट
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरां...
Continue reading
रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई; दिपाली सय्यद, सुषमा अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या...
Continue reading
Mumbai : मुंबईत हुंडा छळाच्या तक्रारींमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ; मात्र हुंडाबळी आणि आत्महत्यांमध्ये मोठी घट
Mumbai : मुंबईत विवाहित महिलांच्या हुंड्यासा...
Continue reading
तणाव, चिंता विसरा! शांत-आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
धावपळीचे जीवन, कामाचा वाढता ताण आणि बदलती जीवनशैली यामुळे मा...
Continue reading
भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Continue reading
तरुणी सेल्फी काढायला आली अन् Rahul Gandhi ना किस देऊन गेली; भर कार्यक्रमातील VIDEO व्हायरल
Rahul Gandhi Video : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते
Continue reading
ग्राम महसूल अधिकारी शिवानंद वाकदकर शेंदुर्जन भाग एक यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, सात दिवसांच्या आत आपल्या गावच्या नियुक्त सहायकांशी संपर्क साधून आपली पीक नोंदणी करावी. वेळेत नोंदणी न झाल्यास येणाऱ्या अडचणींची जबाबदारी खातेदारांची राहील.
शेतकऱ्यांनी या अंतिम संधीचा लाभ घेऊन आपल्या पीकांची नोंदणी वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.
read also : https://ajinkyabharat.com/epfo-update-2026-5-important-changes-which-will-affect-your-pf-account-live/