परभणी, हिंगोली, नांदेडसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के
मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात
भूकंपाचे धक्के बसले आहेत.
Related News
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण; खरेदीसाठी सुवर्णसंधी
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
Prashant Koratkar : जामीन फेटाळला, सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली तरी प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण नाहीच
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
MLC पोटनिवडणूक: राष्ट्रवादीत रस्सीखेच, संग्राम कोते vs झीशान सिद्दिकी – कुणाचं पारडं जड?
कसारा येथे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेचा शनिवारी-रविवारी पॉवर ब्लॉक! प्रवाशांनी सावधान!
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका, विरोधात घेतला मोठा निर्णय
“धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवला !”
अकोल्यात जिल्हा काँग्रेसचे शेतकरी कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन
‘रोहित शर्मा जाडा अन् वाईट…’ – वादग्रस्त वक्तव्याने खळबळ!”
10 जुलै रोजी पहाटे झालेल्या या धरणीकंपामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मराठवाडा जिल्ह्यातील परभणी,
हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात
हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पण प्रात:काळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे
काही काळासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
परभणी जिल्ह्यातील विविध भागांत भूकंपाचा धक्का बसला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी
हा धक्का जाणवला आहे.
परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात भुकंपाचा हा धक्का जाणवला आहे.
अचानकपणे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी लोक भयभीत होऊन घराबाहेर आले.
मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचा हा धक्का 4.2 रिश्टर स्केल
एवढ्या तीव्रतेचा होता. मराठवाड्यालगत असलेल्या
वाशिम सह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले.
सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सात वाजून 14 मिनिटांनी दोन वेळा
भूकंपाची धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले.
जयपूर, टनका, सोंडा, सावळी कृष्णा या गावात परिसरात
घरावरील टीन पत्राचा मोठा आवाज झाला.
गोठ्यात बांधलेली गुरेदेखील या भूकंपामुळे भयभीत झाल्याचे पाहायला मिळाले.
जनावरे सैरावैरा होऊन बाहेर पडण्यासाठी धडपडत होते.
या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/pickanchi-loss-due-to-rain-in-naya-andura-area/