अकोला शहरातील पाणीपुरवठा एका दिवसाने कमी

आजपासून

आजपासूनच होणार प्रारंभ : धरण क्षेत्रात पाऊस, पाणी पातळीत वाढ

महानगरपालिका प्रशासनाद्वारे महान धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे

गेल्या १ जुलैपासून संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा

Related News

आठवड्यातून एक दिवस करण्यात आला होता.

सुदैवाने मागील दोन दिवसांमध्ये सर्वदूर असलेल्या

मूसळधार पावसामुळे महान धरण क्षत्रात जोरदार बरसला असल्यामुळे

धरणामधील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

सध्या ही वाढ हळू हळू असली तरीही भविष्यातील पावसाचे दिवस असल्यामुळे

जल पातळीत मोठी वाढ अपेक्षित आहे.

त्यामुळे पूर्वी शहरातील नागरिकांना होत असलेला हप्त्यातून

पाणी पुरवठा आता एका दिवसाने कमी करून

आता दर सहाव्या दिवशी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

अकोला शहराला पाणी पुरवठा करणारा मुख्य स्रोत महान धरण आहे.

मात्र मृग नक्षत्र कोरडे गेल्याने आणि त्यानंतर येणारा ऋतूही

कोरडाच गेल्याने महान धरणातील पाणी पातळी खालावत गेली.

परिणामी, अकोला शहरातील जनतेची तहान कशी भागवायची,

असा यक्ष प्रश्न मनपा जलप्रदाय विभागाला पडला होता,

त्यामुळे आहे तो जलसाठा जास्त दिवस पुरावा,

यासाठी हप्यातून एक दिवस पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले होते

तर ही पाण्याची गंभीर स्थिती पाहता राजकारण करणाऱ्या

लोकप्रतिनिधी यांनी जिल्ह्यातीलच हनुमान सागर जलाशय वारी भैरवगड येथून

आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यातही राजकारण झाल्याने आणि या पाण्यासाठी

तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

पाणी उचल करण्यासाठी स्थगनादेश दिला आहे.

मात्र सध्या तरी अकोलेकर जनतेची तहान भागविण्यास महान धरण सक्षम आहे.

येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत महान धरणात १०० टक्के पाणी साठले

तर येत्या वर्षभर अकोलेकरांना पाण्याची चिंता राहणार नाही.

महानगरपालिका जलप्रदाय विभागाकडून माहिती घेऊन

प्रशासनाव्दारा शहरात होत असलेला पाणी पुरवठा

आता दर सहाव्या दिवशी होणार असून,

आज १० जुलैपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे.

महान धरणात उपलब्ध जलसाठा पाहून पाणी पुरवठ्याचे दिवस

हळूहळू कमी कमी करत नियमित ३ ऱ्या दिवशी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन

मनपा प्रशासन करीत आहे.

मनपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी

आता सहाव्या दिवशी पाणी पुरवठा करणे शक्य असल्याची माहिती दिली आहे.

तसेच यानंतर पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन

महान धरणामध्ये पाण्याची पातळी वाढल्यास टप्प्या-टप्याने दिवस कमी-कमी करून

पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक पुर्ववत करण्यात येणार आहे.

त्यामुळे शहरातील नागरिकांनी उपलब्ध पिण्याच्या पाण्याची साठवणूक करून

पाण्याचा अपव्यय टाळून सहकार्य करण्याचे आवाहन

अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा करण्यात आले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/10-new-government-medical-colleges-in-the-state/

Related News