महाराष्ट्रातील अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात
शनिवारी रात्री भीषण स्फोट झाला.
यात कोणतीही जीवितहानी किंवा
Related News
जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अपघाताची माहिती मिळताच अमरावती सीपी-डीसीपी
आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी बॉम्बशोधक पथकासह
घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.
साहा आणि सात क्रमांकाच्या बॅरेकच्या बाहेर
घरगुती बॉम्बचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर कारागृह परिसरात एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच कारागृह अधिकारी,
अमरावतीचे पोलीस आयुक्त, डीसीपी यांच्यासह
बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले.
घटनेच्या तपासासाठी तातडीने फॉरेन्सिक टीम
रवाना करण्यात आली.
अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सांगितले की,
शेजारच्या महामार्ग पुलावरून फटाका किंवा
बॉम्ब फेकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ती फेकणारी व्यक्ती कोण आणि त्यामागचे कारण काय?
त्याचा तपास सध्या सुरू आहे.
तपासाअंती स्फोटके फेकणाऱ्या व्यक्तीने
कोणते साहित्य वापरले हे निश्चित करणे शक्य होणार आहे.