विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांकडून दूध ओतून आंदोलन!

दूध

दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

दुधाला किमान 40 रुपये दर करावा अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे.

एकीकडे दूध दरावरून शेतकरी आक्रमक झालेले असताना

Related News

दुसरीकडे केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्यासाठी

परवानगी दिली आहे.

हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मिट चोळण्याचा प्रकार आहे

असं म्हणत शेतकऱ्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.

सरकारने आगोदर राज्यातील दूध भेसळ रोखावी

अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या निर्णयाचे पडसाद आता विधानभवना बाहेर देखील पाहायला मिळत आहेत.

विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांकडून दूध ओतून आंदोलन करण्यात येत आहे.

विधानभवन परिसरात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे.

विधानभवनाच्या मुख्य गेटवर दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं.

केंद्र सरकारने दूध भुकटी आयात केल्याने

दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

रस्त्यावर दूध ओतून या शेतकऱ्यांना आंदोलन केलं आहे.

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/in-the-district-71-thousand-470-children-were-examined-diarrhea-control-was-found-in-pandharvadyat/

Related News