अकोट तालुक्यातील रांभापुर फाटा ते अकोट या मार्गाचे काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे चालत असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सावरा फाटा येथे १२ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी, वाहनचालक, ऑटो युनियन सदस्य तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गाच्या दोन्ही बाजू खोदल्या असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच खोदकामावर पाणी टाकण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडत होती, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती आणि रोडलगत शेतातील पीकावरही नुकसान होत होते.
आंदोलनाचा प्रभाव पाहून संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार घटनास्थळी आले. त्यांनी लेखी आश्वासन दिले की, खोदकामावर पाणी टाकण्याची टंकर संख्या वाढवली जाईल आणि कामाची गती लवकर वाढवली जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी प्रमाणात वाढ करण्याच्या मागणीलाही मान्यता देण्यात आली.
Related News
सातारा जिल्हा बँकेत राजकीय भूकंप! भाजपला ९, राष्ट्रवादीला ८ तर शिंदेसेनेला ४ जागा; सत्तेचे मोठे समीकरण!
सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणते समीकरण बदलेल, याचा नेम नसतो. स...
Continue reading
अकोला दुष्काळावर रणधीर सावरकरांचा ‘मास्टर प्लॅन’! पाणीटंचाई रोखण्यासाठी 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आढावा बैठक
अकोला : अकोला जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, आगामी उन्हाळ्यात उद्भवू...
Continue reading
महाराष्ट्रातील भीषण दुष्काळावर शरद पवारांचा मोठा निर्णय! 85 व्या वर्षी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार
महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट अधिक गडद होत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुष...
Continue reading
कर्जत-भीमाशंकरमधील 32 हजार झाडांच्या कत्तलीवर मोठा विरोध! सूरज चव्हाणांचा सरकारला 1 जबरदस्त पर्याय
महाराष्ट्रातील कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी होणाऱ्या...
Continue reading
एकनाथ शिंदेंना जळगावात मोठा धक्का; माजी संपर्कप्रमुख निलेश पाटील यांचा राजीनामा, अजित पवार गटात प्रवेश
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे सत्र सुरूच असून, मित्रपक्षांमधील नेते ...
Continue reading
“आम्हाला अर्थ खाते पाहिजेच!” छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मोठी प्रतिक्रिया; हिवाळी अधिवेशनापूर्वी खाते मिळण्याची अपेक्षा
राष्ट्रवादी काँग्रेस अर्थखात्यासाठी आग्रही;...
Continue reading
शेतकऱ्यांना मदत लवकरच? ४४ टक्के पंचनामे पूर्ण; १०-१२ ऑक्टोबरपर्यंत १०० टक्के पंचनाम्यांचे कृषिमंत्र्यांचे लक्ष्य
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्...
Continue reading
12 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना मदत द्या, अन्यथा समृद्धी महामार्ग रोखणार; रोहित पवारांचा सरकारला इशारा
रोहित पवार : राज्य सरकारने महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळ जाहीर केला असला,...
Continue reading
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून मोठ्या उपाययोजना
राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार...
Continue reading
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; वाशिममध्ये नेमकं काय म्हणाले?
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...
Continue reading
Rohit Pawar चा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; ‘भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बॉम्बही पिकवायला लागला का?’
दुष्काळी पाहणी दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवरून Rohit Pawarची टीका; शेतकऱ्यांना ...
Continue reading
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोल्यात कृषिमंत्र्यांचा सत्कार; पंचनामे आणि अहवाल...
Continue reading
हा आंदोलन जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे यांच्या आदेशानुसार व अकोट विधानसभा अध्यक्ष नानासाहेब हिंगणकर यांच्या मार्गदर्शनात पार पडला. तालुकाध्यक्ष श्रियश शंकरराव चौधरी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सुत्रसंचलन समर्थ आवारे यांनी तर प्रास्ताविक नागेश आग्रे यांनी केले, तर आभारप्रदर्शन मनीष तळोकार यांनी केले.
पोलीसही सकाळपासून चोख बंदोबस्तात तैनात होते. पक्षाचे युवा आमदार रोहीत पवार यांनी हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला व तो मान्य करून घेतला.
या आंदोलनामुळे रांभापुर-अकोट मार्गाचे काम जलदगतीने आणि दर्जेदार करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत. शेतकरी व स्थानिक रहिवाशांना वाहतुकीस आणि शेतमालाला होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/how-expensive-is-akshay-khanna-i-e-which-company-would-have-made-the-goggles-worn-in-dhurandhar/