हिवाळ्यात रोग टाळण्यासाठी जेवणात असावेत हे 5 औषधी घटक

रोग

आवळा, अश्वगंधा, तुळस, आले, हळद – हिवाळ्यातील रोगप्रतिकारक सुपरफूड

हिवाळा म्हणजे आरोग्याची काळजी घेण्याचा काळ. थंडीच्या दिवसांत शरीराला रोगप्रतिकारक शक्तीची गरज अधिक भासते, कारण सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार पटकन पसरण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्या आहारात काही खास घटक समाविष्ट केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर आतून निरोगी राहते. आयुर्वेदात या हिवाळ्यातील सुपरफूडला महत्त्व दिले आहे. चला जाणून घेऊयात, हिवाळ्यात कोणते 5 पदार्थ आपल्या आहारात असणे आवश्यक आहे आणि ते कसे फायदेशीर ठरतात.

आवळा

आवळा हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. हिवाळ्यातील सर्दी, खोकला, घसा खवखवणे यासारख्या समस्या टाळण्यासाठी आवळ्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते. रोज एक आवळा किंवा एक चमचा आवळा पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्यास शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, पण आवळा चेहऱ्यावर नैसर्गिक चमक परत आणतो.

अश्वगंधा

अश्वगंधा हा आयुर्वेदातील एक अत्यंत उपयुक्त औषधी वनस्पती आहे. हे शरीराला उबदार ठेवते, ऊर्जा आणि स्टॉमिना वाढवते. तसेच ताण-तणाव कमी करतो, झोपेची गुणवत्ता सुधारतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. अश्वगंधा पावडर कोमट दुधासोबत घेणे फायदेशीर ठरते. (गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.)

Related News

तुळस आणि आले

हिवाळ्यातील संसर्ग प्रतिबंधक उपाय म्हणून तुळस आणि आले हे अत्यंत प्रभावी आहेत. तुळस बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा आणि अँटीव्हायरल गुणधर्म असलेला घटक आहे. आले शरीराला उबदार ठेवते आणि पचनास मदत करते. हिवाळ्यात तुळस आणि आल्याचा चहा केवळ घसा खवखवणे कमी करत नाही, तर शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो.

तीळ

तीळ हा हिवाळ्यातील सुपरफूड मानला जातो. यात प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. तीळ शरीराला उबदार ठेवते, हाडे मजबूत करतो आणि त्वचा व केसांसाठी देखील फायदेशीर ठरतो. हिवाळ्यात तीळाचे लाडू, चिक्की किंवा भाज्यांमध्ये तीळ घालून सेवन करणे उत्तम आहे.

हळद

हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा घटक असतो, जो शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असलेला आहे. हिवाळ्यात हळदीचे सेवन सांधेदुखी, सूज आणि संसर्ग टाळण्यासाठी उपयुक्त ठरते. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते आणि चांगली झोप मिळते.

हिवाळ्यात या 5 पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीर आतून मजबूत राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजार टाळता येतात. आवळा, अश्वगंधा, तुळस आणि आले, तीळ, हळद हे पदार्थ आपल्या जेवणात नियमित समाविष्ट करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. या उपायांचा प्रभाव पाहण्यासाठी सातत्यपूर्ण सेवन करणे आवश्यक आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.)

read also:https://ajinkyabharat.com/strict-order-from-central-government-to-improve-air-service/

Related News