अधिवेशन बोलवा, निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणावा – नाना पटोले

महाभियोग

नागपूर: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांबाबत (Nagarparishad Election Result) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी टीका करताना निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणण्याची मागणी केली आहे.

नाना पटोले म्हणाले, “आज राज्यभरात झालेल्या मतदानाचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. तरीही निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेमुळे मतदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की ही प्रक्रिया पहिल्यांदाच पाहत आहेत, तर राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणला पाहिजे.”

पटोले म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जो घोळ दिसतो आहे, मतदारांमध्ये मनस्ताप निर्माण झाला आहे, त्याबद्दल निवडणूक आयोग जबाबदार आहे. महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, ही आमची मागणी आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत.”

Related News

त्यांनी पुढे म्हटले, “निवडणूक आयोग लोकशाहीचा दिवसाढवळा गळा घोटत आहे. जनतेमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे. सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणण्याचा प्रस्ताव ठेवत आहोत. स्वतः मुख्यमंत्री चिंता व्यक्त करत आहेत, तर आता त्यांनी महाभियोग आणावा, आमचा त्यांना पाठिंबा आहे.”

नाना पटोले यांनी सत्तेवर टीका करताना सांगितले की, “सत्तेचा माज या निवडणुकीत स्पष्ट दिसून आला आहे. अनेक ठिकाणी पैसे वाटण्यात आले आहेत. उमेदवारांच्या वाढीव खर्चाची जबाबदारी कोण घेणार, याबाबत सरकारकडे शंका आहे. निवडणूक आयोगाला अशा गोष्टींसाठी घोळ निर्माण करण्यास पाठिंबा मिळाला आहे.”

आरक्षणाच्या विषयावर बोलताना पटोले म्हणाले, “देवेंद्र फडणवीस 24 तासांत ओबीसी आरक्षण लागू करण्याचे दावे करत होते, मात्र अजून काहीही झालं नाही. त्यामुळे काही ठिकाणी आरक्षण 50% पेक्षा जास्त झाले. महाराष्ट्रात अशा पद्धतीने आरक्षणाचा गोंधळ निर्माण करून राज्याचा वस्त्रहरण झालं आहे.”

राज्यात कायदा सुव्यवस्थेवर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले, “सत्ता पक्षाचे आमदार गुंडगिरी करत आहेत, त्यामुळे अनेक प्रकरणे उभी राहिली आहेत. गुन्हेगारांना शक्ती देणं हे सरकारचं धोरण आहे. मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे सर्व काही संशयाच्या भोवऱ्यात आलं आहे. जर निकाल वेळेत आले असते, तर काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनत होता.”

महत्वाचे मुद्दे:

  • निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी

  • निवडणूक प्रक्रियेत घोळ आणि मतदारांमध्ये अस्वस्थता

  • सत्तेच्या वापराने निवडणुकीत अनुचित प्रभाव

  • ओबीसी आरक्षणाचा गोंधळ

  • कायदा सुव्यवस्था आणि गुंडगिरीचा प्रश्न

read also : https://ajinkyabharat.com/hot-breath-and-cold-air-appear-as-mouth-watering-vapor/

Related News