पाकिस्तानशी संपर्क साधणाऱ्या अभियंत्याला न्यायालयाने सुनावली शिक्षा
नागपूर: पाकिस्तानसाठी हेरगिरी करून भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात टाकणाऱ्या ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीतील अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल (२८) याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी तीन वर्षे कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर आणि प्रवीण पाटील यांनी हा निर्णय दिला.
निशांत अग्रवाल नेहरूनगर, रुडकी (उत्तराखंड) येथील मुळ रहिवासी असून भारत-रशिया संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीच्या नागपूर प्रकल्पात सिस्टिम इंजिनियर पदावर कार्यरत होता. तो उज्ज्वलनगर येथील भाड्याच्या घरात राहत होता.
सत्र न्यायालयाने त्याला ३ जून २०२४ रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-एफ अंतर्गत जन्मठेप, शासकीय गुपिते कायद्याच्या कलम ३(१)(सी) अंतर्गत १४ वर्षे, तर कलम ५(१)(ए)(बी)(सी)(डी) आणि ५(३) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर अग्रवालाने या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केली होती.
Related News
TET Exam Shocking Order : महाराष्ट्रातील शिक्षकांना ‘पदोन्नती नको!’ – मुंबई उच्च न्यायालयाचा प्रशासनांना धडाकेबाज आदेश
महाराष्ट्रातील ...
Continue reading
नागपूरमध्ये भाजप नेता सचिन साहू यांची भरदिवसा हत्या झाली आहे. त्यांचा मुलाचा वाढदिवस होता आणि तो त...
Continue reading
Mumbai High Court Alimony Order: स्वतःची आर्थिक स्थिती लपवून पत्नीला दिशाभूल केल्यामुळे हायकोर्टाने घटस्फोटीत पतीला दणका दिला. ...
Continue reading
भारतात महिलांच्या आरोग्याशी संबंधित गोष्टींबद्दल बोलणे अजूनही खुल्या स्वरूपात होत नाही. विशेषतः मासिक पाळीविषयी (पिरियड्स) माहिती विचारणे अनेकांना संव...
Continue reading
लूव्हर म्युझियमचा सुरक्षा घोटाळा: "LOUVRE" हा पासवर्ड जगाला धक्कादायक ठरला; एलोन मस्कदेखील थक्क
पॅरिसमधील जगप्रसिद्ध LOUVRE म्युझियमच्या सुरक्षेचा आडा...
Continue reading
वडिलांच्या डोळ्यासमोर लेकीचा करुण अंत, मेहुण्याचाही मृत्यू; नागपूर हादरले
नागपूर :मृत्यू हा प्रत्येक कुटुंबासाठी अनपेक्षित आणि दुर्दैवी अनुभव ठरतो. नाग...
Continue reading
मतदार यादीच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय — कोणाचा फायदा, कोणाला झटका? संपूर्ण विश्लेषण
मुंबई उच्च न्यायालयाने मतदार यादीतील गोंधळ आणि प...
Continue reading
शिवरायांच्या नावावर कोणाचाही हक्क नाही; मांजरेकरांच्या चित्रपटाला कोर्टाचा हिरवा कंदिल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कोणी एकट्याचं मालकी हक्क सांग...
Continue reading
भिवापूर हादरलं! वडिलांच्या निधनानंतर दोन महिन्यांत मुलाचाही मृत्यू, आईवर दुःखाचा डोंगर
नागपुर जिल्ह्यातील भिवापूर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अव...
Continue reading
जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीसा थांबलेल्या मोसमीपावसाने पुन्...
Continue reading
भारतीय सैन्यदलातील विविध पदांवर सेवा देऊननिवृत्त झालेले माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून अस...
Continue reading
देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारकाजव...
Continue reading
तपासानुसार, अग्रवाल पाकिस्तानमधून नेहा शर्मा आणि पूजा रंजन या नावाने फेसबुक तसेच सेजल कपूर नावाने लिंक्ड-इन अकाऊंट चालवत होता. लखनौ एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार, अग्रवाल भारताच्या सुरक्षा विभागातील काही कर्मचार्यांशी संपर्क साधत होता. त्यानुसार त्याला ८ ऑक्टोबर २०१८ रोजी अटक करण्यात आली होती.
सदर प्रकरणातून भारताच्या संरक्षणात्मक यंत्रणेला गंभीर हानी पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/new-vice-chancellor-of-agricultural-school-dr-vilas-kharche/