..तर उद्धव ठाकरेंना नक्कीच फायदा होईल; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य चर्चेत

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी जर महाविकास आघाडीबरोबरची आघाडी टिकवली

तर त्यांचा फायदा होईल. उद्धव ठाकरेंचा मतदार सध्या

Related News

एकनाथ शिंदेंच्या बाजूने झुकलेला दिसतो आहे.

तो पुन्हा उद्धव ठाकरेंच्या बाजूनेही जाऊ शकतो.

पण उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडी बरोबरच राहिले तर त्यांचा फायदा होईल

असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे हे एक यशस्वी मुख्यमंत्री आहेत

हे नाकारता येणार नाही असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणूक ही जनता विरुद्ध भाजपा अशी झाली आहे

असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

तसेच १० जागांवर पोटनिवडणूक आहे,

त्या ठिकाणीही जर असेच निकाल आले तरच मी म्हणेन की मतदार शिफ्ट झाला.

मात्र तसे घडले नाही तर ही तात्पुरती फेज आहे असे म्हणता येईल

असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

तसेच उद्धव ठाकरेंबाबत त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

महाविकास आघाडी बरोबर न गेल्याने आम्हाला फटका बसलेला नाही.

याऊलट लोकांचा काही नेत्यांवरचा विश्वास उडत चालला आहे.

दलित आणि मुस्लिम उमेदवार जर मविआबरोबर गेला असेल

तर जुलैमधल्या पोटनिवडणुकीत ते चित्र स्पष्ट होईल.

विधानसभेत तर चित्र कळेलच.

पण त्याआधी पोटनिवडणुका होणार आहेत त्यामध्येही समजेल

असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण माझ्यावर आरोप करत असतील तर करुदेत.

मात्र नागपूर आणि कोल्हापूरमध्ये आमचा पाठिंबा का घेतला? त्यांनी उत्तर द्यावे.

आम्हाला कुठलाही डॅमेज वगैरे झालेला नाही. भाजपाचे नेते काय म्हणतात ते सोडा.

पण एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी ही जी लढत झाली.

त्यात एकनाथ शिंदेंनाही कमी मते मिळाली नाहीत.

एकनाथ शिंदेंच्या मतांमध्ये दलित, ख्रिश्चन, भटके, मुस्लीम यांची मते नाहीत.

ही जर तुलना पाहिली तर हिंदू मतांचे प्रमाण हे एकनाथ शिंदेंकडे जास्त आहे.

मी भाजपाचे उदाहरण जाणीवपूर्वक देत नाही.

पण त्यांचाही मतदार बोलका आहे असे मला वाटते.

काँग्रेसच्या नेत्यांबाबत मी काहीही मत व्यक्त करत नाही.

महाराष्ट्रातल्या नेत्यांना मी महत्त्व देत नाही कारण तिथे हायकमांडची पद्धत आहे.

हायकमांडकडून जे सांगितले जाते तेच पुढे फॉलो होते असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Read also: 18 जूनला झालेली UGC NET परीक्षा रद्द !

Related News